श्रीदेवी ने दुबईत घेतला अखेरचा श्वास

बॉलीवुड़ मधील पहिली महिला सुपरस्टार म्हणून किताबाची मानकरी ठरलेली अभिनेत्री श्रीदेवी ने शनिवारी रात्री दुबईत अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवीच्या निधनाने बॉलीवुड मध्ये दुःखाची छाया पसरली आहे.श्रीदेवी ने हिंदी सिनेमा सोबत तमिल, मलयालम, तेल्गु, कन्नड़ व इतर ही भाषातील चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविला होता.
हिंदी मध्ये चक्क जितेंद्र सोबत श्रीदेवी ने १६ सिनेमे केले होते आणि सर्वच चित्रपट सुपरहिट झाले होते. अमिताभ बच्चन, रजनीकांत, ऋषि कपूर, विनोद खन्ना, सन्नी देओल सारख्या कलाकारांसोबत देखील हिट चित्रपट केले.वर्ष २०१३ मध्ये भारत सरकारने श्रीदेवीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. एवढचं कायं तर श्रीदेवी ने चक्क पाच वेळा फिल्मफेयर पुरस्कार पटकविला होता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर