स्वप्नील जोशी सोबत रंगणार यारी नंबर वनच होस्टिंग...
मैत्री ही ठरवून करता येत नसते ती आपसूकच होते. देवाने आपल्या सर्वाना दिलेली ती एक अमुल्य देणगी असते. आयुष्याच्या प्रत्येक सुखा - दु:खात कुठलाही विचार न करता शेवटपर्यंत खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा असतो तो म्हणजे आपला मित्र, दोस्त, सखा, यार... याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मॅकडॅावलस नंबर १ सोडा आणि व्हूय अॅप हे ‘नंबर १ यारी विथ स्वप्नील’ हा हटके कार्यक्रम घेऊन येत आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन सर्वांचा लाडका आणि सगळ्यांचा जिवलग यार स्वप्नील जोशी करणार आहे. कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर करणार आहेत. मराठी सिनेयुगात वडील आणि मुलगा तसेच अत्यंत जवळचे हे दोन मित्र मिळून पहिल्यांदाच मराठीत ‘यारी’वर बेतलेला कार्यक्रम घेऊन येत आहेत.
गप्पांसोबतच कार्यक्रमात कलाकारांसोबत स्वप्नील वेगवेगळे खेळ सुध्दा खेळणार आहे. दोन मित्र एकमेकांना किती चांगल्या पद्धतीने ओळखतात हे आपल्याला यातून बघायला मिळेल. स्वप्नीलचा हा भन्नाट कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर १८ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६ ते ७ वाजता सुरु झाला आहे.
Comments