संदेशात्मक चित्रपट बनविणार - आनंद पांढरे

मुंबईत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट टोटल टेन चे निर्माता आनंद पांढरे आहेत. ह्या चित्रपटाची निर्मिती व इतर बांबीवर आधारित आनंद पांढरे बरोबर अंधेरी स्थित आदर्श नगर ऑफिस मध्ये चर्चा केली.
0 चित्रपट निर्मिता ह्या क्षेत्रात कसे काय आलात ?
चित्रपट निर्मिती ह्या क्षेत्रात येण्याचे मी सर्व श्रेय आर्ट डायरेक्टर सुरेश पिल्ले यांना देतो. त्यांच्यामुळेच मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात आलो आहे. 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत आंतकवादी हमला झाला व त्याच कथानकावर आधारित चित्रपट बनविला आहे. माझ्या मते हा चित्रपट आंतकवादी हल्यातील शहीदांना एक भावपूर्वक श्रंद्धाजली आहे. त्याचबरोबर ह्या चित्रपटात आंतकवादी कसे निर्माण होतात हीच सत्यता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आजची युवा पिढी थोड्याशा पैशामुळे भ्रमित होऊन चूकीचे कृत्य करते व आपले आयुष्य बर्बाद करते. ह्या चित्रपटातून चक्क आजच्या युवा पिढीला संदेश मिळणार आहे व यापुढे कोणताही युवा तरुण कसाब बनणार नाही.
एक निर्माता म्हणून तुमचे ह्या चित्रपटात किती योगदान आहे?
मी प्रत्येक ठिकाणी जातीने हजर असतो व प्रत्येक कामाचे निरीक्षण करतो. एवढेच काय तर शूटिंग ते एडीटींग पर्यत सर्व काही समजून घेतो. माझ्या मते दर्शकांचे फक्त मनोरंजन झाले नाही पाहिजे तर संदेशात्मक मनोरंजन झाले पाहिजे. मी माझ्या प्रत्येक चित्रपटातून दर्शकांचे संदेशात्मक मनोरंजनच करणार आहे. त्याचबरोबर आजच्या तरुण पिढीला संदेश देण्याचे देखील सामाजिक कार्य करणार आहे.
चित्रपट टोटल टेन ची खासियत काय आहे ?
ह्या चित्रपटात दहा आतंकवादी आहेत व ते कशा प्रकारे हल्ला करतात व त्यानंतर काय घडते हीच सत्य परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दहा आतंकवादी आहे म्हणूनच चित्रपटाचे टाइटल टोटल टेन ठेवले आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार राजन वर्मा, मुकेश ऋषि, आशिष विद्यार्थी, शिवा, सचिन खेडेकर, यतिन कार्येकर, एहसान खान, सुदेश बेरी, मुश्ताक खान व प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग चे वडिल योगराज सिंग देखील एका पाकिस्तानी आतंकवाद्याच्या भूमिकेत आहे. त्याच बरोबर चित्रपटात एक श्रद्धाजंली गीत देखील आहे..
अन्य नवीन प्रोजेक्ट कोणते आहेत ?
मराठी चित्रपट फुलपाखरु बनवित आहे. ह्या चित्रपटाची कथा भ्रूण हत्येवर आधारित आहे. व ह्यातील मुख्य कलाकार प्रदीप पटवर्धन व उषा नाडकर्णी आहे. त्याच बरोबर मराठी मालिका समृद्धि बनवित आहे. ह्या मालिकेत एका लेडी आयपीएस ऑफिसर ची कथा दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे. एवढंच काय तर नुकताच चित्रपट गुणतंत्र चा मुहूर्त देखील केला आहे. ह्या चित्रपटात मुख्य भूमिका राजन वर्मा साकारीत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर