1 मे 1960 मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई
निर्माते हेमंत सुधीर संसारे यानी ध्रुव आर्टस या बैनरखाली 1 में 1960 या आगळ्या शिर्षकांतर्गत एक संवेदनशील नाट्यकृतीची निर्मिती करीत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन राज पाटील यांच असून याचं लेखन ही त्यांचच आहे. नाटकाची संकल्पना निर्माते हेमंत संसारे यांची असून एक अत्यंत संवेदनशील आणि अंतर्मुख करणा-या ज्वलंत विषयावर हे नाटक बेतलं आहे असे निर्माता-दिग्दर्शक यांचा दावा आहे. 1 मे 1960 हा दिवस म्हणजे महाराष्ट्र निर्माणाचा दिवस या दिवशीच मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून खास करुन मराठी माणसांमध्ये या दिवसाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे.
Comments