रंगभूमिवर चित्रपटाचा अनोखा मुहूर्त तुमचं आमचं जुळलं

एखाद्या चित्रपटाचा मुहुर्त चक्क रंगभूमिवर तो देखील शेकडो रसिकांच्या उपस्थितित करण्याची किमया नुकतीच दिग्दर्शक प्रकाश भालेकर यानी साध्य केली. वैजयंती प्रोडक्शनच्या बैनरखाली आकारास येत असलेला तुमचं आमचं जुळलं या धमाल मराठी विनोदी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच शिवाजी मंदीर नाट्यगृहात मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. ह्यावेळी अभिनेता कुलदीप पवार व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यावर एक दृश्य चित्रित करुन चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
तुमचं आमचं जुळलं च्या कथानका बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रकाश भालेकर म्हणाले कि हा एक राजकीय विषयावरचा विनोदी चित्रपट आहे.
चित्रपटातील मुख्य कलाकार कुलदीर पवार, प्रिया बेर्डे, चेतन दळवी, मोहन जोशी, सयाजी शिंदे, अशोक शिंदे व अन्य आहेत. हा चित्रपट मराठीतील मल्टीस्टार चित्रपट ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर