हर हर महादेवचा शो बंद पाडला
शंकर मराठे, मुंबई - 7 नोव्हेंबर 2022 : पुणे स्थित पिंपरी येथे संभाजी ब्रिगेडने 'हर हर महादेव'चा शो बंद पाडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातून विरोध होत आहे.
पिंपरी येथे हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आला आहे. पिंपरीमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी हातात भगवे झेंडे घेवून थेट चित्रपटगृहात घूसले आणि चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला.
त्याचबरोबर सोलापुरात देखील हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आला आहे
Comments