धर्मवीर पार्ट 2 कधी येणार?
शंकर मराठे, मुंबई - 13
नोव्हेंबर 2022 : नुकताच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा वाढदिवस होऊन गेला व सिनेमा धर्मवीर मध्ये आनंद दिघेची मुख्य भूमिका प्रसाद ओक ने साकारली होती. हैप्पी बर्थडेच्या शुभेच्छा देताना प्रसाद ओक ने सोशल मीडियावर लिहिले आहे -- ”प्रिय प्रविण वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा, माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी 'धर्मवीर' च्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो. मात्र प्रसाद ओकच्या या पोस्टनंतर सर्व प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. या पोस्टमुळे धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे हे पक्के झाले आहे.
अपघात होऊन आनंद दिघे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो असे चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये पत्रकारांची भूमिका साकारणारे चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी दिघेंच्या मृत्यूवर चित्रपटाच्या शेवटी प्रश्न निर्माण करताना दिसले आहेत.
त्यानंतर या चित्रपटाची कथा अद्यापि संपली नाही व आनंद दिघे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलं आहे
Comments