'सोहळा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीस
मराठी चित्रपटसृष्टीला अनेक वेगवेगळ्या व नव-नविन कथानकावर आधारित हटके सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे. विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. या निमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगांवकर ह्या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.
अरिहंत प्रॉडक्शन हया बैनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून के.सी बोकाडिया द्वारा प्रस्तुत ह्या सिनेमाचे निर्माते आहेत सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा. ह्या महिन्यात २१ डिसेंबरला प्रदर्शित होणा-या हया चित्रपटांत एकूण ४ गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. 'पांस्थथ मी', 'तुझ्या माझ्या आभाळाला', 'नो प्रॉब्लेम' या गाण्यांचा आस्वाद आपल्याला या सिनेमात घेता येणार आहे. पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगांवकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर या गायकांनी सिनेमातील गाणी गायली आहेत. विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहे.
Trailer Link :-
https://youtu.be/yp2zfoL-IsI
Comments