के सी बोकाडिया यांचा मराठी चित्रपट 'सोहळा' बॉक्स ऑफिस वर देणार २ सिनेमांना जोरदार टक्कर
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात के. सी. बोकाडिया यांचा पहिला मराठी चित्रपट 'सोहळा' प्रदर्शित होणार आहे व ह्याच बरोबर आणखी दोन मराठी चित्रपट भाई व थापाड्या देखील प्रदर्शित होणार आहे.
'नसीब अपना अपना' हे ब्रीद मनात जपत हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश करणारे निर्माते-लेखक के. सी. बोकाडिया यांनी 'जनता कि अदालत' मध्ये अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या सोबतीने पठडीतल्या विषयांचा 'रिवाज' मोडीत काढला. 'जवाब हम देंगे' म्हणत हिंदी चित्रपट क्षेत्रात 'हम तुम्हारे हे सनम', 'प्यार कभी झुकता नही', 'तेरी मेहरबानियां', 'आज का अर्जुन', 'कुदरत का कानून', 'डर्टी पॉलिटिक्स' यांसारख्या असंख्य चित्रपटांद्वारे वैविध्य आणण्याचा प्रयत्न करणारे सुप्रसिद्ध निर्माते म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. सतत नावीन्याच्या शोधात असणारे के. सी. बोकाडियांना आता मराठी चित्रपटसृष्टीतील बदलाचे वारे खुणावू लागलेत. मराठीच्या प्रेमाखातर के. सी. बोकाडिया यांनी आपल्या बॅनरद्वारा म्हणजेच अरिहंत प्रॉडक्शन प्रस्तुत 'सोहळा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा निर्मित व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'सोहळा' येत्या ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, शिल्पा तुळसकर, आस्मा खामकर यांसारख्या अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी 'सोहळा'च्या निमित्ताने रसिक-प्रेक्षकांना पहायची संधी लाभणार आहे. 'सोहळा' चित्रपटाची कथा मानवी नातेसंबंध आणि विभक्त कुटुंब पद्धती मधील द्वंद्व अधोरेखित करते. या चित्रपटाच्यानिमित्ताने दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि अभिनेते सचिन पिळगांवकर पहिल्यांदाच एकत्रितपणे काम करताना दिसतील. सोहळा मध्ये एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांनी ती संगीतबद्ध केलेली आहेत. 'पांस्थथ मी', 'तुझ्या माझ्या आभाळाला', 'नो प्रॉब्लेम' अशा विविध धाटणींच्या गाण्यांना पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर आदी गायकांनी आपल्या सुरेल स्वरांत स्वरबद्ध केले आहे तर चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे आहे.
आजच्या विषयाशी सुसंगत 'सोहळा' ४ जानेवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत नक्की पहा.

Comments