सोनू निगम व हरिहरन ने केरला येथे पूराने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी फण्ड रेज़र शो केला सौरभ दफ़्तरी सोबत
"संगीतम चैरिटेबल ट्रस्ट" चे फाउंडर सौरभ दफ़्तरी मागील पाच वर्षापासून संगीत क्षेत्रांशी संलग्न कलाकारांना आर्थिक मदत करत आले आहेत. साहव्या रेहमतें म्यूजिक कार्यक्रमांचे आयोजन मुंबई मधील षणमुखानंद हॉल मध्ये केले, तेथे सोनू निगम व हरिहरन ने लाइव परफॉर्म केला. ह्या शानदार इवेंट मध्ये संगीत इंडस्ट्री मधील पदम विभूषण उस्ताद ग़ुलाम मुस्तफा ख़ान, पदमश्री अनूप जलोटा, लेज़ले लुईस, तलत अज़ीज़, सलीम मर्चेंट, जसपिंदर नरूला, ब्राईट आउटडोर चे मालक योगेश लखानी आणि संगीत आवडणारे पाहुणे आले. ह्या कॉन्सर्ट मध्ये १८ म्यूजिशियन ने सिंगर बरोबर साथ दिली. इ बिज़ एंटरटेनमेंट इंडिया प्राइवेट लिमिटेड ह्या म्यूजिक कॉन्सर्ट चे होस्ट आहेत. हरिहरन व सोनू निगम ने एका पेक्षा एक अशी गाणी गायली आणि लोकांचे भरपूर मनोरंजन केले. सौरभ दफ़्तरी ने ह्या कॉन्सर्ट मध्ये समाविष्ट स्पॉन्सर्स आणि लोकांचे आभार मानले. एलआईसी, कनकिया बिल्डर, एस बी आई, एक्सिस मुचुअल फण्ड, महिंद्रा फाइनेंस ने ह्या कॉन्सर्ट मध्ये आपले योगदान दिले. संपूर्ण हॉल खचाखच भरला होता, लोकांनी संगीताचा मनसोक्त आनंद घेतला.
Comments