हिंदी कॉमेडी चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’ मध्ये योगा प्रमोट करणार.
एकता
जैन, श्री
राजपूत, हर्षवर्धन
जोशी आणि अजय सिंग हिंदी कॉमेडी चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’ मध्ये
योगा प्रमोट करणार.
एक्ट्रेस एकता जैन, श्री
राजपूत, हर्षवर्धन
जोशी आणि अजय सिंग हिंदी कॉमेडी चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’ च्या
चित्रिकरणात व्यस्त आहेत. ह्या सिनेमाचे संपूर्ण चित्रिकरण गुजरातच्या गांधीनगर येथे
होणार आहे.
सध्या प्रत्येक चित्रपटांतून काहीतरी संदेश दिला जात आहे, तर असे असताना हर्षवर्धन जोशी ने आपल्या
सिनेमाच्या माध्यमातून योगाचा प्रचार करण्याचे ठरविले आणि चित्रपटांत एक योगाचा सीन
टाकला. यूनिट मधील सर्व लोकांना दररोज शूटिंग सुरु होण्यापूर्वी ३० मिनिटें योगा करायला
सांगितले आहे.
सर्वांनी ह्या अभियानात हिस्सा घेतला आणि दररोज सकाळी शूटिंग सुरु होण्यापूर्वी
सर्वजण योगा करायला लागले आहे. एकता जैन ने सांगितले कि योगा केल्याने मन शांत राहते
आणि काम करायला नवीन ऊर्जा मिळते.
Comments