शताब्दी वर्षामध्ये तंबु मधील सिनेमा
दादासाहेब फाळकेंच्या कालखंडात डोकावणा-या आगामी
मराठी चित्रपट टुरिंग टॉकीज व्दारे भारतीय चित्रपटसृष्टीच्या या शताब्दी वर्षात
दादासाहेब फाळकेंना मानवंदना देण्यात येणार आहे. तृप्ती भोईर निर्मित व गजेंद्र
अहिरे दिग्दर्शित टुरिंग टॉकीज हा चित्रपट १९ एप्रिल रोजी मुंबई मध्ये वरळीच्या
खुल्या जांभोरी मैदानात तसेच पुणे व गोवा येथील खुल्या मैदानात कापडाच्या
तंबूमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके
आणि इतर निर्माते १०० वर्षापूर्वी त्यांचे चित्रपट अशाच प्रकारे कापडाच्या
तंबूमध्ये प्रदर्शित करत. कारण त्याकाळात चित्रपटगृह नव्हते. जत्रा किंवा यात्रामधून
तंबूत दाखविल्या जाणारा फिरत्या सिनेमाचा इतिहास जमा होत चाललेल्या परंपरेचा
मागोवा तृप्ती भोईर निर्मित व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित टुरिंग टॉकीज ह्या चित्रपटा
द्वारे घेतला जाणार आहे. हा अविस्मणीय अनुभव शहरी लोकांना घेता येणार आहे.
Comments