तृप्ति भोईर व गजेंद्र अहिरे ची टुरिंग टॉकीज



भारतामध्ये १०६ वर्षापूर्वी फिरत्या चित्रपटांचे बीज रोवले गेले. त्या काळात चल चित्रांची रीळ इतर देशांतून आयात केली जात असे. इंग्रज अधिकार-याच्या मनोरंजनासाठी हे चल चित्र आयात करुन तंबूत दाखवली जात असे. दादासाहेब फाळकेंनी असाच एक चित्रपट तंबू मध्ये पाहिला व ते प्रभावित झाले आणि अशा प्रकारे चित्रपट बनविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. राजा हरिशचंद्र या पहिल्या सिनेमा व्दारे भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तवेढ रोवली गेली. परंतु चित्रपट थिएटर मध्ये दाखविणे सुरु झाल्यानंतर त्याचा थेट फटका टूरिंग टॉकीज चालविणा-यांना बसला. मुंबई मध्ये ३०-४० वर्षापूर्वी रस्त्यावर, दोन बिल्डिंगमध्ये, चाळी मध्ये, भव्य मैदानात परदे लावून सिनेमांचा आनंद घेतला जात होता, पण आज ही टुरिंग टॉकीज संस्कृति इतिहास जमा होत चालली आहे. दादासाहेब फाळकेंच्या कालखंडात डोकावणा-या आगामी मराठी चित्रपट टुरिंग टॉकीज व्दारे भारतीय चित्रपटसृष्टीच्या या शताब्दी वर्षात दादासाहेब फाळकेंना मानवंदना देण्यात येणार आहे. तृप्ती भोईर निर्मित व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित टुरिंग टॉकीज हा चित्रपट एप्रिल महिन्यात मुंबई मध्ये वरळीच्या खुल्या जांभोरी मैदानात तसेच पुणे व गोवा येथील खुल्या मैदानात कापडाच्या तंबूमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

 




Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर