BOX OFFICE वर के सी बोकाडिया यांचा मराठी चित्रपट 'सोहळा' देणार २ सिनेमांना जोरदार टक्कर
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात के. सी. बोकाडिया यांचा पहिला मराठी चित्रपट 'सोहळा' प्रदर्शित होणार आहे व ह्याच बरोबर आणखी दोन मराठी चित्रपट भाई व थापाड्या देखील प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेमा 'सोहळा' नव वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणारा कौटुंबिक व भावनाप्रधान असा मराठमोळ्या शैलीतला चित्रपट आहे. एवढचं काय तर ह्या चित्रपटांचे चित्रिकरण देखील रत्नागिरी सारख्या निसर्गरम्य परिसरात केले असून सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, शिल्पा तुळसकर, आस्मा खामकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी 'सोहळा'च्या निमित्ताने रसिक-प्रेक्षकांना पहायची संधी लाभणार आहे. सतत नावीन्याच्या शोधात असणारे के. सी. बोकाडियांना आता मराठी चित्रपटसृष्टीतील बदलाचे वारे खुणावू लागलेत. मराठीच्या प्रेमाखातर के. सी. बोकाडिया यांनी आपल्या बॅनरद्वारा म्हणजेच अरिहंत प्रॉडक्शन प्रस्तुत 'सोहळा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा निर्मित व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'सोहळा' येत्या ४ जानेवारीला प्रदर्शि...