सिने पत्रकार शंकर मराठे यांचे पहिले काल्पनिक कथेवर आधारित ई-पुस्तक ‘देवा हो देवा’ लांच
मुंबई –
मागील २० वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत सिने पत्रकार शंकर मराठे यांनी
आतापर्यंत हिंदी दैनिक ‘अमर उजाला’, हिंदी दैनिक ‘प्रभात खबर’ व ‘नेटवर्क १८’ समूहांची ‘कमोडिटीज
कंट्रोल डॉट कॉम’ हिंदी-इंग्रजी भाषेतील वेबपोर्टल सारख्या
टॉप टेन मधील मिडिया हाउसेस मध्ये विभिन्न पदांवर काम केले आहे व सध्या बॉलीवुड़
फिल्म इंडस्ट्री वर आधारित ‘बॉलीवुड़ मार्केट’ नावाच्या खासगी ईपेपर साठी लेखन कार्य करत आहे. शंकर मराठे यांचे पहिले
काल्पनिक कथेवर आधारित ‘देवा हो देवा’
हे ई-पुस्तक ६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवसाच्या शुभदिवशी समाजातील
मान्यवरांच्या उपस्थित लांच करण्यात आले.
चित्रपटांवर
आधारित पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी काय सुचली, ह्याबद्दल शंकर मराठे यांनी सांगितले कि अनेक वर्तमानपत्रांसाठी फिल्मी
लेखन करत असताना अनेक वर्तमानपत्र वाचावयास मिळत असे. एकवेळ
एका हिंदी वर्तमानपत्रात आमिर खान स्टारर हिंदी चित्रपट ‘थ्री
एडियट’ ची दोन पानांची स्क्रिप्ट प्रकाशित झाली होती व तीच
स्क्रिप्ट अनेक वेळा वाचून माझ्या मनात काल्पनिक कथानकावर स्टोरी लिहिण्याची
कल्पना आली.
काल्पनिक
कथेवर आधारित ‘देवा हो देवा’ ह्या ई-पुस्तकांविषयी व लेखनकार्याविषयी मिडियांशी बोलताना शंकर मराठे
म्हणाले, ‘एखादी गोष्ट मनाला सारखी
सतावत असेल तर ती आपण लेखन शैलीतून मांडू शकतो, हे मला लेखन
करायला लागल्यापासून उमजले. सुरुवातीला एक छंद व आवड म्हणूनच मी फिल्मी क्षेत्रात
लेखन कार्य सुरु केले. दैनिक ‘अमर उजाला’ ह्या हिंदी वृत्तपत्राच्या मुंबई ऑफिस मध्ये कार्यरत असताना २००० साली
माझा पहिला लेख हिंदी ‘सामना’ मध्ये
टीवी अभिनेत्री संगीता घोष ची मुलाखत प्रकाशित झाली होती व त्यासाठी मला १००
रुपयांचे मानधन देखील मिळाले होते. त्याचबरोबर लहानपणापासून चित्रपट बघण्यासाठी
आवड व फिल्मी क्षेत्रातील आकर्षणामुळेच मला फिल्मी न्यूज,
लेख, मुलाखती विविध मराठी-हिंदी वर्तमानपत्रातून प्रकाशित
करण्याचा जणू काही छंदच लागला होता. हिंदी दैनिक ‘प्रभात खबर’ ची फिल्म पुरवणी ‘रंग’ साठी
मुंबई ऑफिस मध्ये इंटरटेनमेंट रिपोर्टर ह्या पदावर काम करताना देखील मी
महाराष्ट्रातील अनेक मराठी वर्तमानपत्रात स्वतंत्र पत्रकार म्हणून लिहित राहिलो, ते देखील कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता. एवढंच काय हिंदी दैनिक ‘लोकमत समाचार’, ‘राज एक्सप्रेस’ व मराठी दैनिक ‘लोकमत’ आणि ‘गावंकरी’ च्या फिल्म पुरवणी साठी २ वर्षापर्यांत
लेखन कार्य केले. त्याचबरोबर ‘नेटवर्क १८’ समूहांची ‘कमोडिटीज कंट्रोल डॉट कॉम’ ह्या हिंदी-इंग्रजी भाषेतील वेबपोर्टलसाठी कॉपी राइटर म्हणून ६ वर्षे काम
केले. लेखनांचा छंद जोपासताना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले, परंतु सरस्वतीचा देवीचा आर्शीवाद असल्यामुळेच मागील २० वर्षापासून फिल्मी
दुनियेत लेखन कार्य जिद्दीने व जोमाने करत आहे. वर्ष
२०१२ च्या डिसेंबर महिन्यात खास १० दिवसांची ऑफिस मधून सुट्टी घेऊन एका मराठी
चित्रपटांची कथा-पटकथा-सवांद व गाणी देखील लिहिली आहे व त्यासाठी काही
निर्मात्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत, जेव्हा मी ह्या
निर्मात्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला त्यांच्या चित्रपटांचे मराठी
वर्तमानपत्रात प्रमोशन करण्याचे काम दिले व मी मागील ४-५ वर्षापासून पीआरओ चे काम
करत आहे. मराठी चित्रपट ‘नटी’, ‘जाणिवा’, ‘सर्व मंगल सावधान’, ‘आयपीएल – इंडियन प्रेमाचा
लफडा’ तर हिंदी चित्रपट ‘तारा’ साठी पीआरओ म्हणून काम केले आहे. ६ नोव्हेंबर, २०१७ रोजी चित्रपटांची काल्पनिक कथेवर आधारित ‘देवा
हो देवा’ हे ई-पुस्तक माध्यमातून प्रकाशित करण्याचा सुर्वण
योग आला आहे. हे पुस्तक वाचकांसाठी www. http://shankarmarathe.blogspot.in/ ह्या ब्लॉग वर उपलब्ध आहे.
Comments