संचितीची मूर्ति लहान, पण गायन क्षेत्रात कार्य महान
गायिका श्रेया घोषाल सोबत गाणं गायची इच्छा है
संचिती ची
जून्या काळापासून चालत आलेली मराठमोळी म्हण ’सोळावं वरीस धोक्याचे’ फारच प्रचलित आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या
प्रत्येक १६ वर्षाच्या मुलीला ही म्हण तंतोतंत लागू व्हायची. आता बघा ना, सोळावं वरीश धोक्याचे असताना देखील ह्याच
वयाच्या मुलीने म्हणजेच मुंबई नगरीत लहानाची मोठी झालेली व सध्या रुईया कॉलेज
मध्ये बारावीचे शिक्षण घेत असणारी संचिति सकट ने वयाच्या १६ व्या वर्षी गायन
क्षेत्रात आपली एक मानाची जागा प्राप्त केली आहे.
वयाच्या १३ वर्षापासून आपला पहिला एलबम ‘आमची मुंबई’ पासून संचिति ने
गाणं गायला सुरुवात केली. हा एलबम मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती व इंग्रजी
भाषेत होता. आतापर्यंत १०-१२ एलबम मधून वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहे, तर ‘नृत्यांगना’, ‘गहाण’ व ‘जिद्द’ सारख्या मराठी चित्रपटांसाठी देखील
पार्श्वगायिका म्हणून आपल्या गायनाचा जलवा दाखविला आहे. एवढेच नाही, तर संचिती ने ‘ढूंढ
लेंगे मंजिले हम’, ‘फिल्मसिटी मुंबई
नगरी’, ‘किप सेफ डिस्टन्स’ सारख्या बॉलीवुडच्या हिंदी चित्रपटासाठी सुद्धा
गाणी गायली आहे.
शबाब साबरी चा एलबम ‘लव हुआ’ मध्ये संचिती ने फारच रोमांटिक गाणं गायले आहे.
ह्या एलबमच्या विडियोचे चित्रिकरण नाशिक येथील मनमोहक व निसर्गरम्य लोकेशन वर
करण्यात आले आहे. हा एलबम झी म्यूजिक ने रिलीज केला आहे.
छत्रपती शिवाजी गौरव, महाराष्ट्र गौरव सारखे काही एवार्ड देखील संचिती ने प्राप्त केले आहेत.
एवढचं काय तर संचिती ने आपल्या पहिल्या एलबमचे मानधन नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ फाऊंडेशन’ साठी दिले आहे.
सोनू निगम सोबत संचिती ने एलबम ‘इन द लव’ साठी गाणी गायली आहे तर शान, सुनिधी चौहाण, साधना सरगम,
वैशाली माडे सोबत देखील गाणी गायली आहे. कुमार सानू बरोबर मराठी एलबम ‘चकवा’ साठी संचिती रोमांटिक गाणं गायले आहे.
त्याचबरोबर भविष्यात श्रेया घोषाल पर गाणं गाण्याची संचितीची इच्छा आहे.
Comments