निर्माता प्रदीप के शर्मा ‘डायरेक्ट इश्क’ आणि ‘एक तेरा साथ’ चित्रपटानंतर नवीन दोन चित्रपट बनविणार आहे
निर्माता प्रदीप के शर्मा, ह्यांनी रजनीश दुग्गल, निधी सुब्बईया सोबत ‘डायरेक्ट इश्क़’ बनविला आणि नुकताच प्रदर्शित झालेला अरशद
सिद्दीकी सोबत हॉरर सिनेमा ‘एक तेरा साथ’ बनविला. प्रदीप के शर्मा तसे तर
राजस्थान येथील राहणारे आहेत, परंतु बिहार व मुंबई मध्ये कामे
करतात. त्यांनी बाबा मोशन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड ह्या बैनर खाली चित्रपट
निर्मिती सुरु केली आहे. प्रदीप के शर्मा चे स्वप्न आहे कि त्यांच्या बैनर चे नाव
भारताबरोबर सपूंर्ण दुनियेत व्हावे. प्रदीप के शर्मा यांनी सांगितले कि पुढील नवीन
सिनेमाची नावे आहेत ‘आशिक सरेंडर’ आणि ‘इश्क़ाबाद’. अरशद सिद्दीकी सोबत हॉरर सिनेमात शरद
मल्होत्रा, हृतु दुदानी और मेलानी नाज़रेथ यांनी काम केले
आहे. ह्या चित्रपटांत स्वाति शर्मा ने पाच गाणी गायली. त्याचबरोबर राहत फ़तेह अली
खान, अमन त्रिखा, भूमि त्रिवेदी व के के देखील गाणी
गायली. प्रदीप के शर्मा प्रत्येक वर्षी दोन सिनेमे बनविणार आहेत.
सिनेमा बनविणे सोपं आहे, पंरतु डिस्ट्रीब्यूशन करने कठिन काम आहे -
निर्माता प्रदीप के. शर्मा
निर्माता प्रदीप के. शर्मा यांचे एकाच वर्षात दोन सिनेमे प्रदर्शित
झाले आहेत. चित्रपट ‘डायरेक्ट इश्क’ ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आणि २१ ऑक्टोबर
रोजी चित्रपट ‘एक साथ तेरा’ रिलीज झाला आहे, ‘एक साथ तेरा’ हॉरर-रोमांटिक थ्रिलर सिनेमा आहे. दोन्ही
चित्रपटांची मेकिंग उत्तम झाली होती व दर्शकांना आवडले देखील आहे. चित्रपट ‘एक तेरा साथ’ च्या
रिलीज च्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी निर्माता प्रदीप के. शर्मा बरोबर चर्चा केली.
सादर करत आहे चर्चेचे मुख्य अंश –
प्रोड्यूसर ह्या नात्याने दोन्ही चित्रपटाला किती हातभार लावला आणि
आखलेल्या बजट मध्ये चित्रपट बनले का ?
-- निर्माता ह्या नात्याने मी पहिल्या दिवसापासून काम करतो आणि
प्रत्येक बाबी वर नजर ठेऊन असतो. चित्रपटांची स्क्रिप्ट, स्टार कास्टिंग व शूटिंग च्या वेळी देखील सेट वर
उपस्थित असतो. एवढचं काय तर आखलेल्या बजट मध्येच सिनेमा बनवितो.
दोन्हीं चित्रपटांतून लावलेले पैसे कवर झाले का ... आणि कशा
प्रकारच्या अडचणी आल्या होत्या ?
-- पहिला सिनेमा ‘डायरेक्ट इश्क’ दर्शकांनी
फारच पसंत केला व हा चित्रपट नो लॉस नो प्रॉफिट चा सौदा साबित झाला. आता दूसरा
सिनेमा ‘एक तेरा साथ’ नुकताच रिलीज झाला आहे व बॉक्स ऑफिस वर चांगला
रिपोर्ट येत आहे. ह्या दोन्हीं सिनेमे रिलीज करताना मला बरचं काही शिकावयास
मिळाले. एवढं मात्र समजले कि सिनेमा बनविणे सोपं आहे, पंरतु डिस्ट्रीब्यूशन करने कठिन काम आहे.
भविष्यात ह्याकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करेन.
भविष्यात बनविणारे चित्रपट कोणते आहेत ?
-- बाबा मोशन पिक्चर्स च्या बैनर खाली दोन सिनेमे बनवित आहे. एका
चित्रपटाचें नाव आहे ‘आशिक
सरेंडर’ तर दूसरा आहे ‘‘इश्क़ाबाद’.
Comments