सुभाष काळे यांचा स्वाईन फ्लू पर लघूपट बैलेन्स २ अवर्स

दिग्दर्शक सुभाष काळे ह्यांनी सद्याच्या बहूचर्चित आणि भयावह अशा स्वाईन फ्लू वर जनजागृती करण्याच्या उद्देशाने बैलेन्स २ अवर्स हा लघूपट दिग्दर्शित केला आहे.
आतापर्यंत विविध फिचर फिल्म यशस्वीपणे दिग्दर्शित केलेल्या सुभाष काळे यांचा लघुपट दिग्दर्शित करण्याचा पहिलाच प्रयत्न असून अत्यंत ज्वलंत अशा सामाजिक विषयावर तो ही स्वाईन फ्लू सारख्य़ा आजच्या ज्वलंत समस्येवर आधारित असणा-या या आशयाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
नवा उभरता कलाकार शैलेश गायकवाड ह्याच्या अथक परिश्रम आणि जिद्द यामुळेच ह्या लघुपटाची निर्मिती होणे शक्य झाले. ह्या लघूपटाची कथा-पटकथा सुभाष काळे यांची असून संवाद भालचंद्र यांचे आहेत. छायांकन अनिल झेवियर यांच असून यात अशोक शिंदे, के. वृषाली, रीना जाधव, गणेश दिवेकर, संगीता माने, बालकलाकार अस्मिता काळे आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर