रहस्यमय कॉमेडी चित्रपट काळशेकर आहेत का...........
ब्रम्हा व्हिजन प्रस्तुत सुर्यकांत सुर्यवंशी निर्मित आणि विजय सातघरे दिग्दर्शित काळशेकर आहेत का... या मराठी चित्रपटा रिलीज होण्यासाठी पूर्णपणे तैयार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अनिल पवार यांचे आहे. ह्या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून हा रहस्यमय कॉमेडी टाइपचा चित्रपट आहे. भरत जाधव व दीपाली सय्यद पऴून लग्न करण्याकरिता एका बंगल्यात जातात व पुढे सारा रहस्यमय प्रकार सुरु होतो. आता ह्या रहस्यम प्रकारा बद्दल सांगण्या पेक्षा हा चित्रपट चक्क थिएटर मध्ये पहाणेच योग्य ठरेन. एवढंच काय तल आयटम बॉय संजय नार्वेकर वर एक धडाकेबाज आयटम गीत देखील चित्रपटाची खास बात आहे. या चित्रपटात भरत जाधव, दीपाली सय्यद, संजय नार्वेकर, रेश्मा मर्चंट, दिपक शिर्के, उषा नाडकर्णी, किशोर नांदलस्कर, रर्विंद्र बेर्डे, जयराज नायर, गणेश दिवेकर, विजय चव्हाण, आशा न्याते, जनार्दन परब, विकास सामुद्रे, रेशम चितार इ. कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाला चिनार-महेश यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. लवकरच चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी प्रदर्शित करण्याचा विचार आहे.
Comments