चित्रपट गोष्ट छोटी डोंगराएवढी प्रदर्शनासाठी सज्ज
कृषी प्रधान देशातला शेतकरी आज अतिशय खडतर परिस्थिति मध्ये जीवन जगतोय आणि दुस-या बाजूला शहरी नोकरदार, नवश्रीमंत वर्ग भौतिक सुख उपभोगत या सगळ्यापासून आज खूप दूर आणि अलिप्त उभा आहे आणि कॉपोरेट इंडिया चा डोलारा ज्याच्या आधारावर उभा आहे, त्या ग्रामीण भारतातल्या जनतेच्या मुलभूत गरजाही स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षात प्रशासनाला पूर्ण करता आलेल्या नाहीत. पंचतारांकित हॉटेलात बसून इंडियन सुपरपॉवर होत असल्याच्या गप्पा मारल्या जातात आणि दुसरीकडे भ्रष्ट राज्यकर्ते अनेक चांगले प्रकल्प कागदावरच ठेवुन स्वताची पोटं भरत आहेत. या सर्व गोष्टीवर विचार करायला लावणारा मराठी चित्रपट म्हणजे... गोष्ट छोटी डोंगराएवढी.
सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोसले, लक्ष्मीकांत खाबीया, सुरेश सुवर्णा या पाच मित्रांनी एकत्र येऊन प्रेक्षकांना सकस आशयघन कलाकृती देण्याच्या उद्देश्यातून पेन्टगॉन प्रोडक्शन प्रा. लि. या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि त्यातून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी या दोन चित्रपटांची निर्मिती केली. त्यातील गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड यशस्वी ठरला आणि आता गोष्ट छोटी डोंगराएवढी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
गोष्ट छोटी डोंगराएवढी ही कथा आपल्या शीर्षकाप्रमाणे शेतक-याच्या डोंगराएवढ्या संकटाची एक छोटी गोष्ट आहे. कृषीप्रधान देशातल्या शेतक-याचे वास्तव जीवन, मुलभूत सुविधांचा अभाव आणि भरीस भर निसर्गाचा कोप. तरी ही शेतकरी संकटाशी दोन हात करीत जगतोय. लोकशाहीशी त्यांचा संबंध केवळ मतदानापुरता. एरवी लोकशाहीचे कुठले फायदे शेतक-याला मिळतात...मदतीसाठी कुणाकडे बघायचे तर कोरडया आभाळाकडे.
नंदू नावाचा शेतकरी असाच जगतोय, आभाऴाकडे डोळे लावून. आज वरच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला त्याने धीराने तोंड दिलंय... पण आता बिन लग्नाच्या सख्या बहिणी प्रमाणे कर्जाचा डोंगर ही वाढत चाललाय. मावळणा-या सुर्याप्रमाणए तो रोज थोडा थोडा कर्जाच्या ओझ्याखाली बुडत जातोय. त्याच दरम्यान नाईलाजाने शहरातून गावाकडे आलेला त्याचा सुशिक्षित मित्र राजाराम त्याच्या साथीला आलाय. जो खूप आशावादी आहे. नव्याने शेती करू बघतोय. नंदू ही त्यांच्या मदतीने नव्या उमेदीने कामाला लागतो. नंदूला जेव्हा कर्जापायी बैल गहाण ठेवावा लागतो आणि बैलाच्या जागी तो स्वताला जुंपून शेती करू लागतो, तेव्हा राजाराम त्याचा मदतीला धावून येतो. पण नंदूच्या संकटाची यादी मोठी आहे आणि राजारामची ही परिस्थिती बेताचीच असल्याने शेवटी नंदूचा धीर खचतो. बाकीच्या लोकांनी घरातले सामान उचलून नेल्यावर तर तो किटकनाशक पिऊन जीव देतो. हे सगळे राजारामाच्या डोळ्यादेखत घडते. निरक्षर नंदू सुशिक्षित राजारामाच्या मांडीवर जीव सोडतो. पण राजाराम हतबल आहे. सुशिक्षित असूनही. आणि ही हतबलता राजारामाला अस्वस्थ करते. त्याला नंदूता काय दोष होता हेच कऴत नाही. नंदू मेल्यानंतरही त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न सुटलेला नाही... तसा तो कोणत्याच शेतक-याच्या कुंटुबाचा सुटत नाही. शेतक-याने जीव दिल्यावर लाखाची मदत करणारी व्यवस्था शेतकरी जीवंत असेपर्यंत काही हजाराचे कर्ज सुखासुखी का देत नाहीं... शेतक-याच्या आत्महत्यांबाबतीत सगळेच एवढे उदासीन का आहेत....
गोष्ट छोटी डोंगराएवढी ती संकल्पना मकरंद अनासपुरे यांची असून कथा-पटकथा-संवाद शाम पेटकर-अरविंद जगताप यांच्या लेखनीतून उतरली आहे. सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोसले, गिरीजा ओक, माधवी जुवेकर, मधु कांबीकर, शिल्पा अनासपुरे या कलाकारांच्या यात महत्वपूर्ण भूमिका आहेत. नुकतेच आपल्याला सोडून गेलेले ज्येष्ट अभिनेते निळु फुले यांची अविस्मणीय भूमिका ही आपल्याला या चित्रपटात पहायला मिऴणार आहे.

Comments
Ya movie che shooting kuthe jhale hyachi mahiti pahije.hoti