संपूर्ण कुटुंबाने पहावा असा सिनेमा  ‘ओह माय घोस्ट’

 



रेटींग - ****

जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सना वसिम खान व रोहनदीप सिंह यांनी केली आहे. हॉरर कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. अंधेरी येथील पीवाआर मध्ये हया सिनेमाचा प्रिमियर संपन्न झाला. या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गाढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

वसिम खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहेत. मोहसीन चावडा हे या चित्रपटाचे लेखक, संवादलेखक आहेत. अतिरिक्त संवादलेखन निखिल लोहे यांचे आहे. हनीफ शेख यांनी अॅक्शन दिग्दर्शनाचे काम पाहिले आहे. संगीत आणि गायन रोहित राऊत यांचे आहे तर कला दिग्दर्शन खुशबू कुमारी यांनी केले आहे. पार्श्वसंगीत सत्या, माणिक आणि अफसर यांचे आहे या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद येथे झाले आहे.

सिनेमाची कथा जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाची आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनःस्थितीत असताना त्याला स्वप्नात भुते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे होते आहे, असे त्याला वाटू लागते आणि त्याच्या जीवनातील समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भुतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्यातून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते.

संपूर्ण कुटुंबाने पहावा असा सिनेमा ‘ओह माय घोस्ट’ आहे. हा सिनेमा पाहताना फारच मजा येते व पुढे काय होईल हयाबद्दल उत्सुकता देखील तितकीच वाढते. लाॅकडाऊन संपल्यानतंर रिलीज झालेला पहिलाच मराठी सिनेमा आहे. दर्शकांचे नक्कीच संपूर्ण मनोरंजन करेल हयाबद्दल तर काही शंकाच नाही.

अभिनेता प्रथमेश परब बरोबर इतर कलाकारांनी एकदम वास्तविक अभिनय केला आहे. चित्रपट पाहताना फारच मजा येते तर काही सीन पाहताना थरारक अशी भीति देखील वाटते. जग्गू भूताच्या इच्छा कशा प्रकारे पूर्ण करतो हे तर पाहण्याजोगे आहे. त्यासाठी तर दर्शक हा सिनेमा नक्की पाहतील.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर