'जुर्म और जज़्बात' मध्ये रोनित रॉय करणार गुन्ह्यांच्या आड दडलेल्या भावनांचा पर्दाफाश

 


शंकर मराठे  - मुंबई, २३ फेब्रुवारी २०२१:  मनोरंजन विश्वात खळबळ उडवून देण्यासाठी येत आहे शेमारू टीव्हीचा पहिला सनसनाटी क्राईम शो 'जुर्म और जज़्बात'. आपल्या दर्शकांची आवड लक्षात घेत शेमारू टीव्ही सादर करत असलेल्या या अनोख्या शोचे सूत्रसंचालन करत आहेत टेलिव्हिजन क्षेत्रातील नामवंत कलाकार, एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अतिशय लोकप्रिय अभिनेते रोनित रॉय. एका नव्या अवतारात पहिल्यांदा रोनित रॉय करणार आहेत प्रत्येक गुन्ह्यामागे दडलेल्या भावनांचा पर्दाफाश. 'जुर्म और जज़्बात' हा पहिला असा क्राईम शो आहे जो दाखवून देईल की कशाप्रकारे प्रत्येककाही अनावर भावना कारणीभूत असतात आणि या  अनावर भावना कश्या एका सामान्य माणसालाही गुन्हेगार बनवू शकतात. अगदी सर्रासपणे घडणाऱ्या भयानक गुन्ह्यांमागे भावनांचा गुंता उलगडून दाखवणारा हा शो आपल्यापैकी प्रत्येकाला मानवी भावभावनांबद्दल विचार करण्यास भाग पाडेल हे नक्की.

आपल्या प्रेक्षकांसाठी क्राईम थ्रिलर शैलीतील नव्या प्रकारचा शो सादर करण्यासाठी शेमारू टीव्हीने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात आढळून आले की कशाप्रकारे भावना आपल्यावर नियंत्रण ठेवतात आणि नंतर याच भावना अतिशय भयानक रूप धारण करतात.  या सर्वेक्षणात काही अशा खास गोष्टी समजल्या ज्यामुळे या शोचे नाव 'जुर्म और जज़्बात' ठेवले गेले.  लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे यात भाग घेणाऱ्यांपैकी ७५% पेक्षा जास्त लोक असे मानतात की, गुन्हे आणि गुन्हेगारी वर्तणुकीला   वेगवेगळ्या मानवी भावना कारणीभूत असतात.  सर्वेक्षणात आढळून आलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या काळात गुन्ह्यांमागे दोन सर्वात महत्वाच्या भावना असतात ‘लोभ आणि अहंकार’ 'जुर्म और जज़्बात' हा असा शो आहे जो पाहताना प्रेक्षकांना नक्की जाणवेल की आपण त्या गोष्टींशी जोडले गेलेलो आहोत. या शोबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता शो सुरु होण्याच्या आधीपासूनच स्पष्टपणे दिसू लागली आहे कारण पहिल्यांदा शोचे शूटिंग देशातील अनेक छोट्या शहरांमध्ये करण्यात आले असून स्थानिक कलाकारांनाही यामध्ये खूप वाव देण्यात आला आहे. 

हा शो सुरु होत आहे याचा आनंद व्यक्त करत अभिनेते रोनित रॉय यांनी सांगितले, "जुर्म और जज़्बात हा शो माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण तब्बल ५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आज या शोमधून मी पुन्हा एकदा टीव्हीवर येतो आहे. त्याचबरोबरीने या शोमध्ये गुन्ह्यांमागे दडलेल्या भावनांवर प्रकाश टाकण्याची वेगळी संकल्पना मला खूप आवडली.  सर्वात खास गोष्ट म्हणजे हा शो शेमारू टीव्हीवर सुरु होत आहे, जी एक फ्री टू एअर वाहिनी आहे आणि मोठ्या शहरांपासून छोटी शहरे आणि गावांपर्यंत सर्वत्र ही वाहिनी पाहिली जाते. मला खात्री आहे की या शोचे शूटिंग करताना मला जितका आनंद मिळाला, तितकाच आनंद आमच्या प्रेक्षकांना हा शो बघताना मिळेल." 

आपल्या एकापेक्षा एक उत्कृष्ट कार्यक्रमांमुळे शेमारू टीव्ही ही वाहिनी हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये घराघरांत अतिशय लोकप्रिय झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या प्रेक्षकांना २०२१ ची शानदार भेट देत या वाहिनीने तीन नवीन कार्यक्रम सुरु केले.

'जुर्म और जज़्बात' हा सनसनाटी क्राईम शो शेमारू टीव्हीवर २३ फेब्रुवारी रात्री दहा वाजता सुरु होत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि पुन्हा दुपारी १२ वाजता हा शो शेमारू टीव्हीवर दाखवला जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर