‘येताय ना लग्नाला’ मध्ये बाब्याचा रोल करतोय सिद्धार्थ जाधव
निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री एका
नव्या-को-या मनोरंजक मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे आणि त्या चित्रपटांचे नाव
आहे ‘येताय ना लग्नाला’.
सध्या ह्या चित्रपटांचे चित्रिकरण
मुंबईतील उपनगर गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील मंदिर लोकेशन वर जोमाने सुरु आहे.
ह्या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव महत्वाचा रोल साकार करत आहे.
‘येताय ना लग्नाला’ मधील
आपल्या रोल विषयी माहिती देताना सिद्धार्थ जाधव म्हणाला कि ह्या चित्रपटांत मी बाब्या
नावाचे कैरेक्टर साकारत आहे, हे कैरेक्टर फारच मजेशीर व गंमतीशीर आहे. ह्या
वर्षीच्या सुरुवातीलाच माझा ‘येरे येरे पैसा’ हा सिनेमा सुपरहिट झाला आहे व माझा ह्या
वर्षीचे उद्देश्य हेच आहे कि प्रेक्षकांना हसवित ठेवायचे आहे. तसेच ह्या वर्षीचा
हा पहिला चित्रपट ‘येताय
ना लग्नाला’ आहे
व ह्या चित्रपटांत माझी कॉमेडी टाइपची रोमांटिक अशी भूमिका आहे. कथानकांच्या
अनुशंगाने नकळतच हास्याचे वातावरण निर्माण होते व त्यातुनच विनोद घडत जातो.
त्यामुळे ‘येताय ना लग्नाला’
मधून देखील प्रेक्षकांना मनोरंजनाचा
खजानाचा मिळणार आहे. ह्या सिनेमात माझ्या अपोजिट रानी अग्रवाल ही नायिका आहे.
सध्या मराठी चित्रपटांतून नव-नवीन
प्रयोग केले जात आहे व मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस आले आहेत, ह्या बद्दल काय मत आहे ? असा प्रश्न विचारला
असता सिद्धार्थ म्हणाला कि खरोखरंच ही बाब मराठी चित्रपटसृष्टी साठी सुखद व आनंदमय
आहे. मराठी चित्रपटांचा सोनेरी काळ सुरु झाला आहे. प्रत्येक
निर्माता-दिग्दर्शक-कलाकार नव-नवीन प्रयोग करत आहे व मराठी प्रेक्षकांबरोबरच
नॉन-मराठी लोकांना देखील आता मराठी सिनेमे आवडु लागले आहेत.
अभिनेत्री रानी अग्रवाल बरोबर काम
करण्याच्या अनुभवाविषयी सिद्धार्थ सांगतो कि रानी फारच गुणी कलाकार आहे, तिचा जरी हा पहिला मराठी चित्रपट असला तरी ती लहानपणापासून
काम करत आली आहे. फक्त मराठी भाषेचा प्रश्न होता, परंतु ह्या
चित्रपटांत काम करता-करता आता चक्क मराठी भाषा शिकली आहे. तिच्या काम करताना फारच
मजा आली. तीने फारच सुरेख काम केले आहे.
Comments