गजेंद्र अहिरे घेऊन येत आहे मराठी चित्रपट ‘सोहळा’
प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व
सुरेश गुंडे यांच्या अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनरल खाली निर्मित मराठी चित्रपट
‘सोहळा’ च्या अंतिम
शेड्यूलचे चित्रिकरण नुकतेच मड आयलैंड स्थित क्रिश विला येथे पार पडले.
चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत. चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवशी अभिनेता
सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते व अन्य डांसर सोबत एक पार्टी सॉग चित्रित करण्यात आले व
हे गाणे कोरियोग्राफ फुलवा खामकर ने केले आहे. संगीत दिले आहे नरेंद्र भिडे यांनी.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटांविषयी
माहिती देताना सांगितले कि चित्रपटांचे कथानक हे आजच्या माइक्रो फैमिली युगातील
आहे. ह्यामध्ये नातेसंबंधातील झालेला बदल व एक वेगळेपण दाखविण्याचा आगळावेगळा
प्रयत्न केला आहे. सचिन व शिल्पा ने मुख्य भूमिका साकारली आहे तर ह्या चित्रपटांत
विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, मोहन जोशी व इतर कलाकारांच्या भूमिका देखील तेवढ्याच महत्वपूर्ण आहे.
हा चित्रपट एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस आहे.
‘जिदंगी ही गोल गोल आहे...’ ह्या पार्टी सॉग चे दोन-तीन शॉट चित्रित झाल्यानंतर अभिनेता सचिन
पिळगांवकर ने सांगितले कि आज ह्या चित्रपटांच्या शेड्यूलचा शेवटचा दिवस आहे व
माझ्या अपोजिट अभिनेत्री शिल्पा तुळस्कर आहे. आमच्या दोघांवर हे पार्टी सॉग चित्रित
करण्यात आले आहे. चित्रपटांविषयी सांगायचे झाले तर मी इतकेच सांगेल कि
चित्रपटांच्या नावातच सिनेमाची कथा लपलेली आहे. नात्या-गोत्यांच्या संबंधातून हा
एक आगळावेगळा सोहळा आहे. जुन्या काळी सर्व कुंटुंब एकत्र राहत असे व आता ह्या
मॉर्डन युगात माइक्रो फैमिलीचे रुप प्राप्त झाले आहे. हा चित्रपट तर घरांतील
प्रत्येकजणा साठी एक ‘सोहळा’ आहे.
अभिनेत्री शिल्पा तुळस्कर
ने चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि ह्या चित्रपटांत माझ्या अपोजिट
सचिन पिळगांवकर आहे, तर चित्रपटांचे डायरेक्टर गजेंद्र
अहिरे असून ह्या चित्रपटांत काम करताना आमच्या तिघांची ट्यूनिंग इतकी जुळली गेली
कि हा सिनेमा फारच सुरेख व उत्तम प्रकारे बनला आहे. घरांतील प्रत्येकांसाठी हा
सिनेमा नक्कीच ख-या अर्थाने एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा आहे.
Comments