‘येताय ना लग्नाला’ मध्ये सिद्धार्थ जाधव व रानी अग्रवाल ची रोमांटिक धम्माल
निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक
प्रदीप मैस्त्री एका नव्या-को-या मनोरंजक मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे आणि
त्या चित्रपटांचे नाव आहे ‘येताय ना लग्नाला’. सध्या
ह्या चित्रपटांचे चित्रिकरण मुंबईतील उपनगर गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील मंदिर
लोकेशन वर जोमाने सुरु आहे. ह्याच चित्रपटांच्या सेट वर अभिनेता सिद्धार्थ जाधव व
अभिनेत्री रानी अग्रवाल बरोबर गप्पा मारल्या. सिद्धार्थ व रानी ने देखील रोमांटिक
अंदाज मध्ये चित्रपटांतील आपल्या रोल बद्दल सांगितले.
० ‘येताय ना
लग्नाला’ हा कशा प्रकारचा सिनेमा आहे व ह्यातील
भूमिकेबद्दल सांगा?
सिद्धार्थ जाधव
- ‘येताय ना लग्नाला’ ह्या चित्रपटांत
मी बाब्या नावाचे कैरेक्टर साकारत आहे, हे कैरेक्टर फारच मजेशीर व गंमतीशीर
आहे. ह्या वर्षीच्या सुरुवातीलाच माझा ‘येरे येरे पैसा’ हा सिनेमा
सुपरहिट झाला आहे व माझा ह्या वर्षीचे उद्देश्य हेच आहे कि प्रेक्षकांना हसवित
ठेवायचे आहे. तसेच ह्या वर्षीचा हा पहिला चित्रपट ‘येताय ना
लग्नाला’ आहे व ह्या चित्रपटांत माझी कॉमेडी टाइपची रोमांटिक अशी भूमिका आहे.
कथानकांच्या अनुशंगाने नकळतच हास्याचे वातावरण निर्माण होते व त्यातुनच आपोआप
विनोद घडत जातो. त्यामुळे ‘येताय ना लग्नाला’ मधून
देखील प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजानाचा मिळणार आहे. ह्या सिनेमात माझ्या अपोजिट
रानी अग्रवाल ही नायिका आहे.
रानी अग्रवाल -
ह्या सिनेमात मी जिग्नाचे कैरेक्टर साकारले आहे व अभिनेता सिद्धार्थ जाधव सारख्या
अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना बरचं काही शिकायला मिळाले आहे व आमच्या दोघांची
चांगली ट्यूनिंग जमली आहे. सेट काम करताना फारच मजा आली.
प्रदीप मैस्त्री यांच्या दिग्दर्शनाखाली काम
करताना काय अनुभव आला ?
सिद्धार्थ जाधव
- ‘येताय ना लग्नाला’ हा धम्माल
कॉमेडी टाइपचा चित्रपट आहे व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री एक वेळ सीन समजून सांगतात
व कलाकारांना एकदम मोकळे सोडतात, त्यामुळेच अभिनय करताना फारच मोकळीक
मिळते व अभिनय देखील एकदम भन्नाट होतो. त्यांना जस पाहिजे असते, त्यापेक्षा
ही श़ॉट उत्तम प्रकारे चित्रित होतो. प्रदीपजी गुणी डायरेक्टर आहेत. त्यांच्या
दिग्दर्शनखाली काम करताना कोणत्याही प्रकारचे दडपण कलाकारांच्या मनावर येत नाही.
रानी अग्रवाल - ‘येताय
ना लग्नाला’ हा माझा पहिला मराठीला सिनेमा असून देखील
प्रदीपजी ने फारच संभाळून घेतले आहे. ह्या सिनेमाच्या शूटिंग करतानाच मला मराठी
भाषा शिकायला मिळाली.
‘येताय ना लग्नाला’ मधून
मराठी प्रेक्षकांना काय नवीन मेजवाणी पहावयास मिळणार आहे ?
सिद्धार्थ जाधव
- मराठी चित्रपटांचा सोनेरी काळ सुरु झाला आहे. प्रत्येक
निर्माता-दिग्दर्शक-कलाकार नव-नवीन प्रयोग करत आहे व मराठी प्रेक्षकांबरोबरच
नॉन-मराठी लोकांना देखील आता मराठी सिनेमे आवडु लागले आहेत. ‘येताय
ना लग्नाला’ मधून दर्शकांना मनोरंजनाचा खजाना मिळणार आहे.
ह्याबद्दल तर काही शंकाच नको. चित्रपट पाहताना दर्शकांना कोणताही विचार करावा
लागणार नाही व कोणत्याही प्रकारचा शोध घ्यावा लागणार नाही, कारण ‘येताय
ना लग्नाला’ मध्ये दर्शकांचे पूरे-पूर मनोरंजनच होणार आहे.
रानी अग्रवाल - ‘येताय
ना लग्नाला’ ह्या चित्रपटांची कथा फारच रोमांटिक स्वरूपाची
असून कॉमेडीचा नकळत स्पर्श दिल्यामुळे सिनेमा एकदम भन्नाट टाइपचा बनला आहे व
त्यामुळे दर्शकांचे मनोरंजन होणार ह्याबद्दल पूर्णपणे खात्रीच आहे. चित्रपटांत
माझ्या अपोजिट सिद्धार्थ जाधव आहेत व त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील वरिष्ठ
कलाकार महेश मांजेरकर ने धमाकेबाज गडबडी बाबांचा रोल साकार केला आहे, हे
देखील ह्या चित्रपटांचे खास असे वैशिष्टय आहे. एवंढच काय तर सौरभ गोखले, निथा
शेट्टी, संस्कृति बालगुडे व अन्य कलाकार देखील आहेत.
‘येताय ना
लग्नाला’ खास असे वैशिष्टय काय आहे ?
सिद्धार्थ जाधव –
मराठ-मोळ्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी ‘येताय
ना लग्नाला’ हा सिनेमा बनला आहे व कुंटुंबातील लहान मुलांपासून ते मम्मी-पप्पा, आजी-आजोबांना देखील
हा चित्रपट आवडेल, ह्याबद्दल पूर्ण खात्री
आहे.
रानी अग्रवाल - ‘येताय
ना लग्नाला’ हा तर घरांतील सर्वजणांना आवडेल. हा सिनेमा मराठी दर्शकांबरोबर नॉन-मराठी
दर्शकांना देखील नाचायला लावेल, ह्याबद्दल तर काही शंकाच नको. ह्या चित्रपटांत
गीत-संगीताचा देखील मनमोहक खजाना आहे. चित्रपटांची कथा, गीत-संगीत व धडाकेबाज कलाकारांचा अभिनय, इतका अप्रतिम झाला
आहे कि त्यामुळेच सिनेमा धडाकेबाज बनला आहे.
Comments