‘येताय ना लग्नाला’ मधून रानी अग्रवाल ची मराठी चित्रपटांत एंट्री
रानी अग्रवाल
ने बाल कलाकार म्हणून अगदी लहान वयात अभिनय केला आहे. चित्रपट व टीव्ही
मालिकांबरोबर शेकडो व्यावसायिक जाहिराती मध्ये काम देखील केले आहे. एवढंच काय तर
वयात आल्यावर रानी ने बॉलीवुड़ में ‘लव रेसिपी’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती व सध्या ती अजून दोन
हिंदी चित्रपटांत देखील काम करत आहे. एवढंच काय तर रानी ने चक्क मराठी चित्रपट
इंडस्ट्रीत पर्दापण केले आहे निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री
यांचा मराठी चित्रपट ‘येताय ना लग्नाला’ मधून.
ह्या चित्रपटांत रानी अग्रवालच्या अपोजिट अभिनेता सिद्धार्थ
जाधव आहे.
मराठी चित्रपट ‘येताय ना लग्नाला’ मधील
आपल्या रोल विषयी रानी ने सांगितले कि ह्या सिनेमात मी जिग्नाचे कैरेक्टर साकारले
आहे व अभिनेता सिद्धार्थ जाधव सारख्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना
बरचं काही शिकायला मिळाले आहे व आमच्या दोघांची चांगली ट्यूनिंग जमली आहे. सेट काम
करताना फारच मजा आली.
निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री
यांचा मराठी चित्रपट ‘येताय ना लग्नाला’ च्या चित्रिकरणात काय अनुभव आला ? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना रानी म्हणाली कि
सेट वर कौंटुबिक व जिव्हाळ्याचे वातावरण असल्यामुळे काम करायला फारच मजा आली व
माझा हा पहिला मराठी सिनेमा होता व माझी मराठी भाषा नसताना देखील माझ्याकडून उत्तम
प्रकारे मराठीतुन काम करुन घेतले.
Comments