कुणाल रॉय कपूर यांनी विशाल मेहराचा रोमांटिक कॉमेडी सिनेमा 'हम दोनों होंगे कामयाब साइन केला
'देहली बेली' आणि 'नौटंकी साला' ह्या चित्रपटानंतर आता कुणाल रॉय कपूर यांनी धम्माल लव स्टोरी वर आधारित चित्रपट ‘हम दोनों होंगे कामयाब’ साइन केला आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक विशाल मेहरा आहे तर निर्माता प्रमोद गोरे आहे व अर्थव मोशन पिक्चर्स ह्या बैनर खाली चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. ह्या चित्रपटांचे संपूर्ण चित्रिकरण कानपूर येथे होणार आहे.
दिग्दर्शक विशाल मेहरा सांगतात कि ह्या धम्माल लव
स्टोरी वर आधारित चित्रपटात मस्तीचे हंगामे पहावयास मिळणार आहे. चित्रपटात राजेश
शर्मा आणि कुणाल रॉय कपूर सोबत तारा अलिशा बेरी काम करत आहे. ह्या चित्रपटांचे
चित्रिकरण नोव्हेंबर च्या दुस-या आठवडयात सुरु होईल.
तारा अलिशा बेरी ह्या प्रोजेक्ट मध्ये काम करत
असल्यामुळे अतिशय आनंदी आहे. ती म्हणाली कि विशाल सरांनी मला ह्या चित्रपटांत काम
करण्याची सुर्वणसंधी दिली आहे आणि राजेश सर व कुणाल सारख्या ब्रिलियंट कलाकारांबरोबर
करण्याची संधी मिळाली आहे. मला आता असे झाले आहे कि कधी मी कानपूरला शूटिंग साठी
पोहचते.
कुणाल रॉय कपूर सांगतात कि ह्या चित्रपटांत नवीन
लोकांसोबत काम करताना अतिशय आनंद होत आहे. कानपूर चे लोकेशन व कथेमधील
ताजेपणामुळेच नक्कीच मनोरंजनाच्या विश्वात काही तरी नवीन घडणार आहे.
Comments