राजपाल यादव बनला गैस सिलेंडरवाला
सिनेमाच्या
दुनियेत कलाकारांना अनेक प्रकारचे रोल साकार करावे लागतात व अनेक प्रकारच्या
भूमिका साकारल्यावरच कलाकारांचे खरे गुण दर्शकांना समजतात. आता बघा ना
बॉलीवुड़च्या हिंदी चित्रपटांमधून हास्य कलाकार राजपाल यादव यांनी आतापर्यंत अनेक
प्रकारच्या कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत, परंतु गैस सिलेंडरवाल्याची भूमिका राजपाल यादव
यांनी पहिल्या वेळीच साकारली आहे व ती देखील सुदत्ता फिल्म्स च्या बैनर खाली
निर्मित नवा हिंदी सिनेमा ‘‘ये
है लॉलीपॉप’’
मध्ये. ह्या चित्रपटांत राजपाल यादव ची भूमिका जबरदस्त आहे व हा चित्रपट पाहताना
दर्शक नक्कीच लोटपोट होतील. ह्याबद्दल तर काही शंकाच नको.
Comments