इंडियन मिसाइल मैन वर बायोपिक बनवित आहे निर्माता प्रमोद गोरे
सध्या तर बॉलीवुड च्या दुनियेत
बायोपिक चित्रपट बनविण्याचा सर्वच निर्मात्यांना नाद लागला आहे. अर्थव मूवीज च्या बैनर
खाली निर्माता प्रमोद गोरे देखील इंडियन मिसाइल मैन स्वर्गीय अब्दुल कलाम आजाद यांच्या
जीवनावर आधारित एक चित्रपट बनवित आहे.
मराठी चित्रपट ‘बरड’ चे प्रस्तुतकर्ता
प्रमोद गोरे यांनी ह्याच चित्रपटांच्या प्रेस शोच्या वेळी महालक्ष्मी स्थित फेमस स्टूडियो
मध्ये चर्चा करताना सांगितले कि अर्थव मूवीज च्या बैनर खाली सामाजिक विषयांना वाचा
फोडणारे चित्रपटाची निर्माती करायला आवडते. यापूर्वी चित्रपट ‘रेती’ देखील वाळू माफियांवर आधारित होता व आता चित्रपट
‘बरड’ देखील शेतक-यांच्या जमीनीची व्यथा
मांडणारा चित्रपट आहे. आम्ही चित्रपटांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो.
नवीन कोण-कोणते चित्रपट करत
आहे ? ह्या प्रश्नाला
उत्तर देताना निर्माता प्रमोद गोरे म्हणाले कि दोन मराठी चित्रपटांवर काम सुरु आहे, तसेच इंडियन मिसाइल मैन स्वर्गीय अब्दुल कलाम आजाद यांच्या जीवनावर आधारित
एक चित्रपटाचे काम सुरु केले आहे व ह्या चित्रपटाचे नाव इम्पा मध्ये ए.पी.जे. म्हणून
रजिस्टर केले आहे. ह्या चित्रपटांचा दिग्दर्शक हॉलीवुड मधील असेल व ह्याचे चित्रिकरण
ऑगस्ट महिन्यापासून सुरु होईल. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी व साउथच्या भाषेत बनणार आहे.
इंडियन मिसाइल मैन स्वर्गीय
अब्दुल कलाम आजाद यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटा बद्दल अधिक माहिती देताना गोरे
म्हणाले कि कलाम जी यांनी आपल्या भारत देशासांठी भरपूर काही केले आहे व ते आपल्या सर्वासाठी
प्रेरणा स्त्रोत आहेत.
Comments