सामाजिक संदेश देणारा चित्रपट 'बरड'




जमीनीच्या वाढत जाणाऱ्या किंमती किती फसव्या असतात, कुणीतरी आपल्या स्वार्थासाठी एखादी अफवा पसरवितो आणि रातोरात जमीनीच्या किंमती वाढतात, हेच सत्य इमेज एसआरके प्रोडक्शन व प्रस्तुतकर्ता अर्थव मूवीज आणि निर्माता देवेंद्र कापडणीस व सहनिर्माता कुमार गांधी यांचा नवा मराठी 'बर' ह्या चित्रपटातून दाखविण्याचा आगळा-वेगळा प्रयत्न दिग्दर्शक तानाजी घाडगे यांनी केला आहे. हा चित्रपट १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे व ह्या चित्रपटातून दर्शकांना गांवाकडील जमीनीचा व्यवहार कसा होतो आणि त्या व्यवहारांच्या मागे कोण-कोणती मंडळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काम करत असतात, हे पूर्ण सत्य पहावयास मिळणार आहे.
जमीनीच्या व्यवहारांमध्ये गावांकडे सरपंच, आमदार व खासदार मंडळी कशा प्रकारे गुंतलेली असतात व त्यांच्यासोबत गावांमधील दलाल लोक कशा प्रकारे जमीनीच्या व्यवहारात इसार घेऊन शेतक-यांना फसवितात, ह्यांचे सुंदर व सत्य चित्र ह्या चित्रपटात दर्शकांना बघावयास मिळणार आहे.


मुख्य कलाकार - सुहास पळशीकर, शहाजी काळे, भारत गणेशपुरे, किशोर चौघुले, संजय कुलकर्णी, धनंजय जामदार, रोहीत चव्हाण, अजय टापकिरे, वासु पाटील, श्रीकांत बडवे, गीता शिंदे, कमल धोके, नम्रता कुडालकर व श्रावणी जोशी आहेत. दिग्दर्शक – तानाजी घाडगे, कथा-पटकथा–संवाद - देवेन कापडणीस, संगीतकार - रोहन-रोहन, संदीप वाडेकर, गायक – रोहन प्रधान, भारत गणेशपुरे, पियुष अंभोरे आहेत.

चित्रपट का पहावा – सध्या गावांकडे जमीनीचे सौदे कशा प्रकारे होतात व कशा प्रकारे शेतकरी फसले जातात, हे सत्य जाणून घेण्यासाठी हा चित्रपट जरुर पहावा.



रेटींग - ****

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर