भारत गणेशपुरे ने स्वरबद्ध केले ‘कोणी माती खाल्ली रे’
१७ जून रोजी प्रदर्शित होणा-या ‘बरड’ सिनेमाच्या अनेक खासियत आहेत त्यापैकीच एक म्हणजे भारत गणेशपुरे चक्क गातायेत गाणं !
"कोणी माती खाल्ली रे " हे वेगळ्या ढंगाचं गाणं आणि तेही भारत गणेशपुरे च्या आवाजात हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मिथिला कापडणीस यांनी लिहलेलं हे गाणं मराठी संगीताचं लक्ष वेधून घेतय.
बरड सिनेमाच्या कथानकाची गरज होती कि जमिनींच्या व्यवहार संदर्भातलं वास्तव गमतीशीर पद्धतीने यावं. सिनेमाचं कथानक आणि दाहक सामाजिक वास्तव डॉ. मिथिला कापडणीस यांनी तिरकस शब्दात नेमकेपणाने मांडलं. या वेगळ्या शब्दासाठी जेंव्हा खास वेगळ्या आवाजाची शोधाशोध सुरु झाली तेंव्हा भारताला विचारणा केली आणि आधी नकार देणारे भारतजी रेकॉर्डिंगच्या वेळी चांगलेच रंगले, मग गाण्या दरम्यान त्यांनी खास भारत गणेशपुरे स्टाईलच्या हरकती ही घेतल्या हा नवा प्रयोग लोकांना चांगलाच आवडतोय अशी प्रतिक्रिया संगीतकार रोहन रोहन यांनी व्यक्त केली.
Comments