केदार शिंदे – संतोष पवार ची धड़ाकेबाज महाराष्ट्राची लोकधारा

काल झी मराठी वर केदार शिंदे व संतोष पवार ने महाराष्ट्राची लोकधारा हा रंगारंग कार्यक्रम सादर केला व जणू काही मुंबई-पुण्याची पायी-वारी केली, असचं सर्व दर्शकांना वाटलं असावं. मुंबई पासून केदार शिंदे आपल्या बायको (संतोष पवार) ला लग्नानंतर 15 वर्षांनी हनिमून म्हणजेच मधुचंद्रासाठी कश्मीर म्हणजेच मराठमोळ्या भाषेत पुण्याला घेऊन जातो तेव्हा खंडाळ्याचा घाट, लोणावळा, पुणे व तेथील पेठेचे अस काही वर्णन करतो. हे फारच सुरेख होत.


पुण्याचे वर्णन करताना तेथील बारिक-बारिक गोष्टीचे जाण ठेवली आहे व एवढचं काय तर जणू काही नवीन जोडप्यावाणी केदार शिंदे व संतोष पवार ने अप्रतिम अभिनय केला आहे.

परिचय - केदार शिंदे हा मराठी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक आहे. त्याने मराठी भाषेत नाटके, मालिका व चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. केदार शिंदे हा शाहीर साबळ्यांचा नातू आहे. त्याला आधीपासूनच कलेची आवड होती. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती.

केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय.

नाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. त्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर