इंटरव्यू - भरत जाधव
मराठी चित्रपटात अभिनेता भरत जाधव ने आतापर्यत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, परंतु भरतच्या अभिनयात असा काही वेगळाच ठसका आहे कि त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनय वेगळ्या रुप-रंगाचा व बहारदार वाटतो. नुकताच भरतचा शिक्षणाच्या आयचा घो.. हा चित्रपट रिलीज झाला आहे व पुढील महीन्यात काळशेकर आहेत का.. हा चित्रपट रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटाच्या प्रेस कॉन्फ्रेस मध्ये भरत जाधव बरोबर चर्चा केली. चित्रपट काळशेकर आहेत का... मधील भूमिका कशा प्रकारची आहे ? खरं सागूं का ह्या चित्रपटातील माझी भूमिका कॉमेडी टाइपची आहे व हा चित्रपट रहस्यमय फुल-टू कॉमेडी टाइपचा आहे. ह्या चित्रपटाची खासियत काय आहे ? हा चित्रपट प्रियदर्शन टाइपचा मसालेदार कॉमेडीपट आहे. ह्यामध्ये दर्शकांचे सपूर्ण मनोरंजन होणार आहे. दिपाली सैय्यद बरोबर काम करताना काय अनुभव आला? ह्या चित्रपटात दिपाली ने धमाल कॉमेडी टाइपची भूमिका साकार केली आहे व तिच्या बरोबर मी दुस-यावेळी काम करत असल्यामुळे आमची ट्यूनिंग चांगलीच जमली आहे. नवीन येणारे चित्रपट कोणते आहे ? शिक्षणाच्या आयचा घो.. नुकचात रिलीज झाला आहे व काळशेकर आहेत का... रिलीज साठी तैयार ...