अमित खान

कांदबरी पब्लिश होण्यापूर्वी अमित खानच्या कांदबरीचे राइट्स विकले
अमित खान हे नाव सर्वांच्याच ओळखीचे आहे. हिंदी थ्रिलर कांदबरीच्या जगातील सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्या द्वारा लिखित १०० हून अधिक कांदब-या आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. एवढचं नाही तर त्यांच्या कांदब-या मोठ्या प्रकाशन संस्था द्वारे इंग्रजी व मराठी भाषेत देखील प्रकाशित होत आहेत. ते बॉलीवुड़ मध्ये फारच सक्रिय आहेत. त्यांच्या द्वारे लिखित काही हिंदी चित्रपट व टीव्ही मालिका आता पर्यंत टेलीकास्ट झाल्या आहेत. मराठी चित्रपट देखील करत आहेत. संजय लीला भंसाली प्रोडक्शन चा लाल इश्करिलीज़ झाला आहे, जो त्यांच्या कथेवर  आधारित आहे आणि मनमोहन देसाईं प्रोडक्शनचा फिफ्टी-फिफ्टी लवकरत रिलीज़ होणार आहे. इतकेच नाही तर त्यांनी डायमंड कॉमिक्स देखील भरपूर लिहिले आहे, जे हिंदी, इंग्रजी व बंगाली भाषेत प्रकाशित झाले आहे. सर्वात मोठी बाब ही आहे कि आता त्यांच्या २ कांदब-यांचे चित्रपट राइट्स दोन निर्मात्यांनी खरीदे केले आहेत. त्या कांदब-या, ज्या अजून प्रकाशित देखील झाल्या नाहीत. त्याच अमित खान बरोबर चर्चा केली आहे.

लेखनाचा हा प्रवास कसा सुरु झाला  ?
मला स्वःताला माहीत नाही. १२ वर्षाचा होतो, अमेरिकी राष्ट्रपति जॉर्ज वाशिंगटन च्या लाइफ वर पहिली कथा लिहीली आणि ती छापली गेली. तेव्हापासून लिहिण्याचा आणि छापण्याचा क्रम सुरु आहे, तो आतापर्यंत सुरुच आहे. माझी पहिली कांदबरी मी १५ वर्षाचा असताना प्रकाशित झाली होती. आतापर्यंत १०५ कांदब-या प्रकाशित झाल्या आहेत. इतकचं नाही तर शॉर्ट स्टोरीज देखील पब्लिश झाल्या आहेत. इंग्रजी पत्रिका वुमेन्स इरा पासून मनोहर कहानियाँ आणि नवभारत टाइम्स पर्यंत सर्व ठिकाणी माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

कांदबरी वर सिनेमा बनने हे तुम्हांला कितपत योग्य वाटते ?
आज बॉलीवुड मध्ये राइटर भरपूर आहेत, परंतु उत्तम लिहिणा-या लेखकांची कमी आहे. फ्रेश आणि यूनिक थॉट आहेच नाही. चित्रपटांच्या कथेपेक्षा जास्त करून स्क्रीन प्ले महत्वांचा असतो आणि मी समजतो कि प्रत्येत कथेत एक यू.एस.पी. असली पाहिजे. त्याच यू.एस.पी. वर संपूर्ण मार्केटिंग स्ट्रेटेजी बनते. त्यावरच कोटी रूपए लागतात. काही वेळा चांगली स्क्रिप्ट असते, परंतु त्यामध्ये कोणतीच यू.एस.पी. नसते. बॉलीवुड मध्ये पुस्तकांवर सिनेमा बनण्याचा क्रम आता सुरु झाला आहे, परंतु हॉलीवुड मध्ये फार पहिल्यापासून आहे. यापूर्वी गुलशन नंदा जी च्या कांदबरी वर बरेच सिनेमे बनले आहेत.  चेतन भगतच्या कांदबरी वर देखील चांगले सिनेमे बनले आहेत. चित्रपट निर्माते माझ्याकडे चांगल्या ऑफर घेऊन येत आहेत. माझ्या दोन कांदबरी चे राइट, ज्यावर मी काम करत आहेत, कांदबरी प्रिंट होण्यापूर्वी सिनेमा साठी खरीद केले गेले आहेत. एक राइट मिस्टर धवल गाढ़ा (पेन इंडिया) यांनी घेतले आणि दूस-या कांदबरी चे राइट एक एन.आर.आई बिजनेसमैन मिस्टर प्रदीप रंगवानी यांनी खरीदी केले आहेत. त्यावर रेड अफेयरनावाचा सिनेमा बनत आहे – त्याच अरबाज़ खान मुख्य भूमिका करत आहे.

अजून काही प्रोजेक्ट ?
हां, सध्या युवी फिल्म्ससाठी कॉमेडी सिनेमा वर काम करत आहे – त्यांचे नाव सुसाइड सर्कसआहे. हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ह्या चित्रपटांसाठी मला मिस्टर अमिताभ बच्चन यांस कास्ट करायचे आहे. स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावर सर्वांत पहिले त्यांना जाऊन भेटावयाचे आहे.

तुमची ओळख तर एक थ्रिलर राइटर ची आहे, तर हा कॉमेडी सिनेमा ?
मला वाटते कि जर आपण सेंसिबल राइटर आहे, तर काही ही लिहू शकतो. माझ्या लव स्टोरीज देखील पब्लिश झाल्या आहेत. मी कॉमेडी स्टोरीज देखील फार लिहिल्या आहेत. एवढचं नाही तर - सुसाइड सर्कसमाझ्याच एका शॉट स्टोरी वर आधारित आहे.

गुड! ऐकले आहे कि तुमचा एक यू - टयूब चैनल देखील आहे ?
आहे, “अमित खान की चौपालनावाचा माझा एक यू-टयूब चैनल आहे, जो आता सुरु झाला आहे आणि त्याचा चांगला रेस्पांस मिळत आहेत. ह्या चैनल वर माझ्या आवाजात माझ्या कथा आणि कविता आहेत. माझा हा चैनल एक मोठी कंपनी पी.के ऑन लाइनहैंडल करत आहे. एवढचं नाही तर -- अमित खान की चौपालनंतर माझ्याकडे काही रेडियो साठी देखील ऑफर येण्यास सुरु झाल्या आहेत. चैनल ला वाटते कि मी निलेश मिश्रा प्रमाणे माझ्या कथा रेडियो वर ऐकवु. जेव्हा एखाद्या रेडियो चैनल्स सोबत डील फाइनल होईल, तेव्हा मी तुम्हांला सांगेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर