शेमारू टीव्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आले ‘सुहानी सी एक लड़की’

शंकर मराठे  - मुंबई, ११ जानेवारी २०२१:- नव्या वर्षात दमदार पदार्पण करत शेमारू टीव्हीने पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी लोकप्रिय कार्यक्रमांचा नवा खजिना सादर केला आहे. दर दिवशी नवे मनोरंजन आणून आपल्या प्रेक्षकांना नवा उत्साह आणि आनंद देण्यात शेमारू टीव्ही कधीही जराही उणीव राहू देत नाही. लोकप्रिय पौराणिक कथांपासून क्लासिक्स आणि नाटकांपर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी देऊन शेमारू टीव्हीने आपल्या प्रेक्षकांच्या विविध आवडीनिवडी पूर्ण केल्या आहेत. २०२१ मध्ये देखील हीच परंपरा कायम राखत शेमारू टीव्ही आपल्या प्रेक्षकांसाठी – ‘सुहानी सी एक लड़की’ हा आणखी एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम घेऊन आले आहेत.

लॉकडाउनमध्ये सुरु करण्यात आलेल्या शेमारू टीव्हीने याआधीच आपल्या प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणून मनोरंजनाची पुरेपूर व्यवस्था केली आहे.  त्यांचा नवा शो ‘सुहानी सी एक लड़की’ ही दैनंदिन मालिका आहे.  गोष्टीमधील अनेक उतारचढावांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष कायम स्वतःवर खिळवून ठेवेल. ही गोष्ट आहे अलाहाबादमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील सुहानी श्रीवास्तव या छान, मृदू स्वभावाच्या उत्साही मुलीची आणि तिची जिवाभावाची मैत्रीण सौम्या मिश्रा या सुंदर पण काहीशा गर्विष्ठ मुलीची. युवराज हा श्रीमंत युवक आणि त्याचे कुटुंब या गोष्टीत येते आणि तिची रंजकता अधिकच वाढवते.  एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक सौंदर्याचे आकर्षण चटकन भुरळ पाडते, इतकेच नव्हे तर त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या सद्गुणांकडे देखील डोळेझाक केली जाते या मानवी वृत्तीचे दर्शन या गोष्टीतून घडते.  या मालिकेने आपल्या काळात भरपूर लोकप्रियता मिळवली होती आणि आता शेमारू टीव्हीवर पुन्हा एकदा ती बघायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी ते मनोरंजन पुन्हा मिळवण्याची नामी संधी आहे.

'सुहानी सी एक लड़की' मधील प्रमुख भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री राजश्री रानी हिने सांगितले, "सुहानी सी एक लड़की ही माझ्यासाठी अतिशय खास मालिका आहे. सुहानीची भूमिका हा माझ्यासाठी खूपच सुखद अनुभव होता.  शेमारू टीव्हीने त्यांच्या वाहिनीवर ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला याचा मला खूप आनंद होत आहे, कारण यामुळे आता नव्या प्रेक्षकांना माझ्या कामाचा आणि या छानशा मालिकेचा आनंद घेता येणार आहे. मनोरंजन क्षेत्रात शेमारू गेली अनेक वर्षे कार्यरत आहे, आज शेमारू म्हणजे खूप चांगला कन्टेन्ट हे समीकरण पक्के झाले आहे.  शेमारू परिवाराचा भाग बनण्याची संधी मिळते आहे याबद्दल मी खुश आहे.  मला खात्री आहे की मला ही भूमिका करताना जितकी मजा आली त्याहीपेक्षा जास्त आनंद माझ्या प्रेक्षकांना ही मालिका बघताना येईल."

यंदा आपण नव्या वर्षाबरोबरीनेच नव्या दशकाचीही सुरुवात करत आहोत. शेमारू देखील एक नवा अध्याय सुरु करत असून क्षेत्रीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर कन्टेन्ट घेऊन येत आहे. प्रेक्षकांच्या मागण्या, त्यांच्या आवडीनिवडी यांची पुरेपूर काळजी शेमारू घेत आहे. मनोरंजन उद्योगक्षेत्रात हे परिवर्तन अतिशय गरजेचे आहे आणि आजवर याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. नव्या वर्षात मनोरंजनाच्या धारांचा मनोसोक्त आनंद मिळवण्यासाठी तयार राहा, शेमारू टीव्ही तुमचा एकही दिवस कंटाळवाणा जाऊ देणार नाही. दर दिवशी सायंकाळी सहा वाजता शेमारू टीव्हीवर ही मालिका नक्की पहा.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर