अल्बम ''रंग सावळा' सर्वत्र प्रदर्शित ... 

शंकर मराठे  - मुंबई, २७ जानेवारी २०२१: 'रंग सावळा' हा रोमँटिक अल्बम नुकताच प्रदर्शित झाला असून, एका दिवसांत तो पन्नास हजार पेक्षा जास्ती लोकांनी पहिला आहे. समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, आनंद बुरड हे कलाकार या अल्बममध्ये आपणास पाहवयास मिळतील. या अगोदर कॉलेज डायरी या चित्रपटात हे कलाकार एकत्र झळकले होते. निरंजन  पेडगांवकर यांनी गीत, संगीत यासोबतच या गीताला त्यांचा आवाज दिला आहे.


'रंग सावळा' हे गीत अनेक अव्यक्त प्रेमभावनांना हळुवार स्पर्श करतं आणि पुन्हा एकदा प्रेमाची ती जादू अनुभवायला लावतं. आयुष्यात अनेकदा असं होतं की मनातलं प्रेम अव्यक्त राहतं, अशा अनेक गोष्टी असतात ज्या बोलता येत नाहीत पण अनुभवता येतात. 


अल्बमचे दिग्दर्शन मंगेश कुलकर्णी यांनी केले असून कॅमेरा नकुल काकडे, ड्रोन केशव गोरखे तर संकलन शुभम राऊत रांनी केले आहे, तसेच कॉस्ट्यूमची जबाबदारी प्राजक्ता कोळी यांनी सांभाळली असून मेकअप सुजित सुरवसे यांनी केला आहे, प्रथमेश जाधव यांनी प्रोडक्शनची जबडबदारी सांभाळली असून कला दिग्दर्शन गणेश जाधव तसेच लहू पतंगे यांनी सांभाळले आहे. झी म्युझिक कंपनी तर्फे हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल असा निर्मात्यांना विश्वास वाटतो. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर