अक्षय कुमार अभिनीत सूर्यवंशी आता नोव्हेंबर तर रणवीर सिंगचा ८३ डिसेंबरला रिलीज होणार
हिंदी फिल्म वाले ओटीटीकडे वळले. हे दोघे मात्र थिएटर उघडण्यासाठी थांबून आहेत. हे आहेत म्हणून थिएटरवाल्यांच्या जीवात जीव आहे. लॉकडाऊननंतर एकूण हिंदी इंडस्ट्रीला संजीवनी द्यायची धमक सूर्यवंशी आणि 83 मध्येच आहे. एक पडदा थिएटर, मल्टिप्लेक्स, तिथला स्टाफ, वितरक, प्रोड्युसर्स आदी सर्व घटक आता चातकासारखी वाट पाहतील ते या दोन सिनेमांची. व्यवसायत आलेली अनिश्चितता हे दोघे संपवतील असं प्रत्येकाला वाटते आहे.
अक्षय कुमार अभिनीत सूर्यवंशी आता नोव्हेंबर तर रणवीर सिंगचा ८३ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
Comments