शिक्षणाच्या आयचा घो

दिग्दर्शक महेश मांजरेकर व निर्माता संजय छाबरिया, अश्विनी मांजरेकर, सत्या मांजरेकर एका आगळ्या-वेगऴ्या विषयावर आधारित चित्रपट शिक्षणाच्या आयचा घो घेऊन येत आहे व हा चित्रपट १५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रक्षेपित होत आहे.
ह्या चित्रपटाची कथा तशी साधी-सुदी आहे, परंतु पत्येकाच्या घरा-घरातील आहे. एवढंच काय तर आजची शिक्षण पद्धती वर एकदम कटाक्षच केला आहे. मुलांनी अभ्यास केला पाहिजे व त्याला सर्व काही आलच पाहिजे हे तर प्रत्येक पालकांना वाटते व शाळेतील शिक्षकांना देखील वाटते, परंतु मुलांच्या भावना कोणच समजून घेत नाही व त्यामुळे मुलाचे आयुष्य कोणत्या वळणातून जाते व त्याचा काय परिणाम होतो हेच ह्याच चित्रपटात दाखविण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे.
चित्रपटातील मुख्य कलाकार सचिन खेडेकर, भरत जाधव, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर व इतर आहे.
खरंच हा चित्रपट तर महाराष्ट्रातील प्रत्येक दर्शकांनी पाहिलाच पाहिजे...

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर