शंकर मराठे - मुंबई, २८ जानेवारी २०२१: ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ या शॉर्ट फिल्मची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मराठमोळ्या अभय ठाकुर यांनी दिग्दर्शित केलेल्या, मराठी कलाकारांच्या भूमिका असलेल्या या इंग्रजी शॉर्टफिल्मला विविध आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल मध्ये अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वर्ल्ड फिल्म कार्निव्हल, सिंगापूर, कोलकाता इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्डस, टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व सर्वोत्कृष्ट अभिनेता असे 3 पुरस्कार मिळाले आहेत. यूरोपियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल युके, मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, यूरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड अॅमस्टरडॅम, फेस्टिव्हल मध्ये ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ शॉर्टफिल्म फायनालिस्ट मध्ये पोहोचली आहे, तर उरूवती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, तामिळनाडू मध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट लेखन, यतीन कार्येकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि शंतनु मोघे यांना ज्यूरी स्पेशल अवॉर्ड अशा एकूण 5 पुरस्कारांनी...