संगीत कार्यक्रम "रुह-ए-ग़ज़ल"
रंगशारदा बान्द्रा मध्ये संस्कृति मंत्रालय भारत सरकार,
फिल्मस
टूडे, मधु मुर्छना, भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय
स्टेट बैंक, बैंक ऑफ इण्डिया, यूनियन बैंक
द्वारा प्रायोजित आणि महान संगीतकार नौशाद यांना समर्पित संगीत कार्यक्रम
"रुह-ए-ग़ज़ल" फारच शानदार व यशस्वी झाला.
दोन दिवसाच्या ह्या संगीतमय वातावरणात पहिल्या
दिवशी महान गजल गायिका पदमश्री डॉ सोमा घोष, संगीतकार व गायक
विवेक प्रकाश व रौली प्रकाश आणि मिथिलेश लख़नवी जी ने संगीत रसाच्या लाटेने सर्व सदन
आनंदित केले. दूस-या दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीने पुन्हा एकवेळ पदमश्री डॉ सोमा
घोष ने मंचावर उपस्थित झाल्या. भारत रत्न शहनाई वादक उस्ताद श्री बिसमिल्लाह ख़ान कडून
आशीर्वाद प्राप्त गायिका ने आपल्या गायकीला संगीतकार नौशाद जी यांना अर्पित करत आपल्या
मनमोहक व अतिसुंदर शैली ने प्रेक्षकांना मोहून टाकले. उस्ताद अहमद हुसैन व उस्ताद
मोहम्मद हुसैन यांची अलीकडची जुगलबन्दी आणि सत्यम आनन्द जी ने वेग-वेगळ्या रंग व
रसांनी मनमोहक व मंत्रमुग्ध करणारी गजल प्रस्तुत करून प्रेक्षकांना मोहून टाकले. प्रेक्षकांमध्ये
संगीताच्या दुनियेतील काही प्रतिष्ठित व्यक्तिची उपस्थिति, खास करुन सिने गीतकार माया गोविन्द जी
ने संगीताच्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमांची अजूनच शोभा वाढविली.
Comments