नेहा कक्कर ने ‘टीम टीमट्या’ हे गाणं गायले
एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शन चा मराठी चित्रपट
जाणिवा चे निर्माता मिलिंद विष्णु,
अरविंद कुमार, रेश्मा विष्णु आणि एक्टर सरमन जैन आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक
राजेश रणशिंगे आहे. जेष्ठ अभिनेता महेश मांजरेकरचा मुलगा सत्या मांजरेकर ने मुख्य
भूमिका साकारली आहे आणि नवोदित कलाकार वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, संकेत अग्रवाल व त्याचबरोबर किरण करमरकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, उषा नाडकर्णी, किशोर कदम आहे.
नेहा कक्कर आणि हर्षवर्धन दीक्षित जोडीने ‘टीम टीमट्या’ गाणं गायले आहे व संगीत हर्षवर्धन ने दिले आहे तर
तेजश्री बोरकर ने लिहिले आहे. हे गाणं सत्या मांजरेकर वैभवी शांडिल्य वर चित्रित
करण्यात आले आहे. चित्रपटांची कथा पाच मित्रांनी घेतलेल्या प्रतिशोधाची आहे.
नेहा कक्कर फारच उत्साहित आहे कारण तिने पहिल्या वेळी मराठी चित्रपटांसाठी गाणं
गायलं आहे.
Comments