‘Janiva’ releases on July 31st, 2015





मराठी चित्रपट जाणिवा ३१ जुलाई रोजी रिलीज होणार

प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार व निर्माते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर ने मराठी जाणिवा मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे व हा चित्रपट ३१ जुलाई रोजी प्रदर्शित होत आहे.

एंजेल प्रोडक्शन एंड ब्ल्यू आय प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट जाणिवा चे निर्माता मिलिंद विष्णु, अरविंद कुमार, रेश्मा विष्णु व जैन आहे. दिग्दर्शक राजेश रणशिंगे आहेत.

समाजातील कर्तव्याच्या जाणिवा असा या चित्रपटाचा विषय आहे. तरुणाईला भुरळ घालील असा हा चित्रपट आहे. यामध्ये समीर देशपांडे या तरुणाची भूमिका सत्या मांजरेकर करीत आहे.
 
या चित्रपटामध्ये सत्या मांजरेकर, वैभवी साडिल्या, अनुराधा, मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अगरवाल, किरण करमरकर, अतुल परचुरे, रेणुका शहाणे, इंदिरा कृष्णण, सलिल अंकोला, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर आदी कलाकार आहेत.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma