सत्या मांजरेकर


एंजेल प्रोडक्शन चे अरविंद कुमार आणि ब्लू आय प्रोडक्शन मिलिंद विष्णु आणि र्शमन जैन निर्मित मराठी चित्रपट जाणिवा चा ट्रेलर लांच इवेंट बांद्रा स्थित सोफिटेल होटल में संपन्न झाला. बॉलीवुड चे सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते चित्रपट जाणिवा चा ट्रेलर लांच करण्यात आला. ह्यावेळी अभिनेता सत्या मांजरेकर बरोबर चित्रपट जाणिवा विषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सलमान खान च्या हस्ते चित्रपट जाणिवा चा ट्रेलर लांच करण्यात आला आहे, तर कसे वाटले ?
-- सलमान खान ने चित्रपटाचा ट्रेलर लांच केला व त्यांना ट्रेलर फार आवडला आहे. त्यांनी ट्रेलर पाहून माझ्या कामाची स्तुती देखील केली.

चित्रपट जाणिवा मधील समीर देशपांडे चे कैरेक्टर कशा प्रकारचे आहे ?
-- समीर देशपांडे हे इमोशनल व सेन्सेटिव टाइपचे कैरेक्टर आहे. तो नेहमीच सर्वांना मदत करायचा व कोणत्याही समस्याचे समाधान करत असे. परंतु त्याच्या जीवनात एके दिवशी, एक घटना अशी काही घडते कि त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. आता ती घटना काय आहे व त्यामुळे चित्रपटांत विशेष काय घडते, हे तुम्ही चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल. हे शब्दात सांगणे सोपे नाही.

महेश मांजरेकर यांनी कितपत मदत केली ?
-- पप्पानी मला पहिलेच सांगितले होते कि मी तुला काही मदत करणार नाही. हा तुझा चित्रपट आहे व तु तुझ्या हिम्मतीवर करायचा. पप्पानी सांगितल्या प्रमाणे मी देखील जिद्दिने हा चित्रपट केला आहे.

रेणुका शहाणे व किशोर कदम सारख्या वरिष्ठ कलाकारांबरोबर काम करताना काय अनुभव आला ?
-- रेणुका शहाणे व किशोर कदम हे सीनियर व अनुभवी कलाकार आहे. मला त्यांच्या कडून बरचं काही शिकायला मिळाले. त्याच बरोबर चित्रपटांतील अन्य कलाकारांनी देखील मला बरचं काही शिकविले.

चित्रपट जाणिवा ३१ जुलाई रोजी रिलीज होणार आहे, तर काही दडपण आले आहे का ?
-- मी एकदम बिंदास आहे. चित्रपटाची कथा इतकी पावरफुल आहे कि हा चित्रपट दर्शकांना नक्कीच पसंत पडेल. ह्याबद्दल तर काही शंकाच नको. एवढचं काय तर सर्व कलाकारांनी देखील उत्तम अभिनय केला आहे. सशक्त कथा, कलाकारांचा उत्तम अभिनय, गीत-संगीता ने सजविलेला अप्रतिम चित्रपट बनविण्याचा प्रयत्न एंजेल प्रोडक्शन ने केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर