जाहिर सभेत श्री. के. रवि यांचा भाजपा पक्षात प्रवेश

मुंबई – वरिष्ठ पत्रकार, समाजसेवक व उद्योजक श्री. रविंद्र दुपारगडे (श्री. के. रवि) यांनी मुंबईतील वरळी येथे भारतीय जनता पार्टी पक्षात जाहिर सभेत मोठ्या जल्लोषात व उत्साहत आपल्या हजारों संख्याने कार्यकर्तासह गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०१४ रोजी प्रवेश केला. श्री. आशिष शेलार (मुंबई जिल्हा अध्यक्ष भाजपा), सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, श्री. विजय कांबळे (कामगार नेते), श्री दत्ता राणे, श्री. सुनील कर्जतकर, श्री सुनिल राणे (भाजपा मुंबई सचिव) यांच्या उपस्थिति श्री. रविंद्र दुपारगुडे यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत करण्यात आले. श्री. के. रवि यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. 
 
श्री. सुनिल राणे यांनी श्री. के. रवि साहेबांबद्दल आपल्या भाषणात सांगितले कि श्री. के. रवि ही व्यक्ति एक साधीसूधी व्यक्ति नसून एक अवलिया रुपी खराखुरा समाजसेवक आहे. जे एका फकीरासारखे स्वत:कडे काहीही न ठेवता जमेल तेवढे जास्तीत जास्त गरजू आणि गरीब लोकांना देण्याचा सदैव प्रयत्न करीत आले आहेत. त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या सर्वसाधारण गरीब लोकांना व अपंग मुलांना देखील हवाईजहाज ने आकाशातून एक आगळेवेगळे जग दाखविले आहे.
 
श्री. के. रवि म्हणाले कि मी एक समाजसेवक आहे व उच्च स्तरावर समाजसेवा करता यावी ह्याच एकमेव सामाजिक उद्देशाने भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. गरीब लोकांची सेवा करणे, गरजू लोकांना रोजगार मिळविण्यासाठी घडपड करणे, गरजू विद्यार्थांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, अपंग व अंध मुलांना वेळोवेळी मदत करणे. तसेच भविष्यात अनेक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणे करुन माझ्या हातून जास्तीत-जास्त समाजकार्य घडावे व गोरगरीबांची सेवा करता यावी.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर