लघुपट एक चूक...? द्वारे युवा पिढीला मोलाचा संदेश
श्री कडतोबा मुव्हीज प्रोडक्शन कंपनीने एक चूक...? प्रत्येक वेळ आपलीच नसते नावाचा मराठी लघुपट
निर्मित केला आहे. ह्या लघुपटाचे चित्रिकरण सलग दोन दिवसात मुंबई स्थित मढ आयलैंड
येथील मनीषा बंगलो व इतर परिसरात पूर्ण करण्यात आले आहे.
लघुपटा विषयी अधिक माहिती देताना निर्माता के. रवि म्हणाले कि हा
लघुपट तर प्रत्येक तरुण-तरुणीला विचार करण्यासाठी प्रवृत्त करेल कि असे देखील
जीवनात घडते व त्याचा काय परिणाम भोगावा लागतो. जीवनात कोणताही निर्णय घेताना खूप
वेळ विचार करावा. एक चूक... आपल्याला विचार करण्याची ही संधी ठेवत नाही. ना
पश्चाताप करण्याची, प्रत्येक वेळ आपलीच नसते. कधी कधी ती वेळ
आपल्याला फसवू ही शकते.
दिग्दर्शक अनिल म्हात्रे यांनी सांगितले कि या जगात सर्व काही
विधिलिखित आहे. व्यभिचार हा कधीच चांगल घडवून आणत नाही. घरं तुटली जातात. संसार
मोडले जातात. त्यात खून ही होतात. चूकी करणा-याचा ही खून होतो. चूक न करणा-याचा ही
खून होतो. त्याच बरोबर यात अशी कित्येक माणसं भरडली जातात. सोबत समाजात त्यांच्या
बरोबर असलेल्यांची ही नाच्चक्की होत असते.
अभिनेता राहुल रवि ने ह्या लघुपटात नकारात्मक शैलीचे कैरेक्टर साकार
केले आहे. आपल्या रोल विषयी सांगताना राहुल म्हणाला कि माझा रोल थोडासा आबंट म्हणजेच
रसिक व टपोरी टाइपचा आहे. मुली फिरविणे व प्रेमाच्या खेळा बरोबर इतर ही रंगीत खेळ
खेळत असतो व त्यामधूनच एक चूक घडते.
पटकथा, संवाद व दिग्दर्शन अनिल म्हात्रे यांनी केले
आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार राहुल रवि, स्नेहल, भाग्यश्री मेश्राम, के. रवि, डॉ. स्मिता नगरकर, राजेश जोशी, माधुरी व इतर आहेत.
Comments