शिंगणापूरचे शनिदेव बनले मिलिंद गुणाजी
राठौड फिल्म्स प्रस्तुत व जी आर प्रोडक्शन्स चा नविन मराठी चित्रपट शिंगणापूरचे
शनिदेव चा नुकताच गुजरात येथील आमगांव मधील झांसी स्टूडियो मध्ये मुहुर्त संपन्न झाला.
चित्रपटाचे निर्माते राज राठौड व गिता ग्रिश आहेत व दिग्दर्शक महेश मोरे आहेत. ह्या चित्रपटात शनिदेवाची
मुख्य भूमिका अभिनेता मिलिंद गुणाजी ने साकारली आहे. ह्या चित्रपटाचे पहिले शूटिंग
शेड्यूल नुकतेच पूर्ण झाले आहे.
दिग्दर्शक महेश मोरे ने चित्रपट शिंगणापूरचे शनिदेव बद्दल सांगितले कि
लोकांच्या मना मध्ये शनिदेवा बद्दल फारच भिती आहे. त्यांना वाटते कि हा देव इतर देवा
प्रमाणे नाही आहे. शनिची साडेसाती अथवा शनिची पिडा असले शब्द ऐकले तरी लोकांच्या अंगाला
घाम फूटतो. परंतु ह्या चित्रपटात शनिदेव इतर देवाप्रमाणेच द्याळू व आपल्या भक्तांना
नेहमीच मदत करणारा आहे. हेच सत्य दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
निर्माता राज राठौड म्हणाले
कि चित्रपट शिंगणापूरचे शनिदेव हा धार्मिक सिनेमा नाही आहे. हा एक आधुनिक व सामाजिक सिनेमा आहे. शनिदेव कधी ही
आपल्या भक्तांना त्रास अथवा पीडा देत नाही, तर तो आपल्या भक्तांना
सदैव रक्षण करण्यास तत्पर असतो.
चित्रपटातील मुख्य कलाकार मिलिंद गुणाजी, मनोज जोशी, वर्षा उसगांवकर, सुधीर दळवी, आशुतोष कुलकर्णी, पंकज विष्णु, अनिकेत केळकर, श्रद्धा हांडे, अंजली भेनवाल
व इतर आहे. लेखक फारुख बारेलवी आहे. गीतकार श्रवण वाला व म्यूजिक दिग्दर्शक चंद्र शेखर
गाडगीळ आहे.
Comments