'बालक-पालक' ची तिकीट खिडकीवर चांगली कमाई
अभिनेता रितेश देशमुखने नुकताच चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्याची निर्मिता असलेला पहिला मराठी चित्रपट 'बालक-पालक' सध्या तिकीट खिडकीवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अभिनय आणि निर्मितीचा दुहेरी अनुभव असलेल्या रितेशनुसार चित्रपट निर्मिती करणे अभिनयापेक्षा अनेक पटींनी अवघड आहे. छत्रपती शिवाजी या अँनिमेशन पटाच्या प्रदर्शनाला उपस्थित असलेला रितेश म्हणाला की, दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो, पण निर्मिती करताना चित्रपटाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष द्यावे लागते. चित्रपट कसा बनतो, तो कसा प्रेक्षकांसमोर ठेवला जातो, या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे चित्रपट निर्मिती खूपच अवघड काम आहे.' चांगले विषय असल्यास अँनिमेशनपटांनाही प्रेक्षक लाभेल, असे रितेशचे म्हणणे आहे.
Comments