एश आणि सिद्धार्थ रॉय चे टाय-अप
विवाहित जोडपे विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या वेडिंग पार्टीत जवळपास सर्वच बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीला ऐश्वर्या रॉय बच्चन पोहोचली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारणही तसेच आहे. जवळपास दीड-दोन वर्षापूर्वी ऐश्वर्याने गर्भवती असण्याच्या कारणावरून हिरोईन हा चित्रपट अर्धवट सोडला होता. पुढे हा चित्रपट करिना कपूरने पूर्ण केला. ऐश्वर्याने हा चित्रपट अर्धवट सोडल्याने चित्रपटाचे निर्माते असलेल्या युटीव्हीला फार मोठे व्यावसायिक नुकसान सोसावे लागले. तेव्हापासूनच युटीव्हीचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर, रॉनी स्क्रुवाला आणि ऐश्वर्या यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. विद्या व बच्चन कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. विद्यामुळेच ऐश्वर्या या पार्टीला हजर राहिली. या घटनेनंतर विद्यामुळे सिद्धार्थसोबत आणि पर्यायाने युटीव्हीसोबत ऐश्वर्याचे पॅचअप झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Comments