फिल्मी न्यूज – 12 जनवरी, 2013

मराठी चित्रपटात सागरिक घाटगे

'चक दे इंडिया' मधून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतलेल्या सागरिका घाटगे ने आता मराठी चित्रपटांमध्येही पदार्पण केले आहे. या कोल्हापूरकर तरुणीचा लवकरच 'प्रेमाची गोष्ट' नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. अलीकडेच रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या 'बालक पालक' या चित्रपटाचे चांगले यश मिळवले आहे. हिंदीत काम करणारे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी कलाकारही इकडे वळू लागले आहेत. सा‍गरिकालाही चांगली संधी मिळताच तिने मायमराठीतील हा चित्रपट केला. 'चक दे इंडिया' या पदार्पणाच्या चित्रपटातच तिने अतिशय आत्मविश्वासाने काम केले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानसमोरही तिने स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले. मात्र, त्यानंतर तिची हिंदीतील कराकीर्द म्हणावी तशी आकाराला का आली नाही, हे एक कोडेच आहे. आता तिने मराठी चित्रपटाद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची तयारी केली आहे. अस्सल कोल्हापुरी असलेल्या सागरिकाला पुणेरी वळणाचे मराठी बोलणे जरा जडच जाते. त्यमुळे तिने या चित्रपटाते डबिंग करताना बरेच दिवस घेतले, पण आपले काम नीट केले. तिची ही मेहनत पडद्यावर दिसेलच.



सोनाक्षी सिन्हा चे हॉट फोटो शूट

सोनाक्षी सिन्हाला नेहमी एक घरगुती नायिका म्हणून ओळखण्यात येते. पडद्याबाहेर देखील सोनाक्षीने कधीही स्कीन शो नाही दाखवला आहे, पण फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या 2013 कॅलेंडरासाठी सोनाक्षीने अखेर हॉट सीन दिले आहे. तर आता डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरच्या माध्यमाने सोनाक्षी सिन्हाने पण बॉलीवूडच्या दुसर्‍या नायिकांना संदेश दिला आहे की ती देखील सेक्सी आणि ग्लॅमर्स गर्ल आहे.



मुंगेरीलाल बनला रणवीर

जुन्या जमान्यात टीव्हीवर अनेक चांगल्या सिरियल्स होत्या. ज्या अद्यापही लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. बुनियाद, हमलोग, कमरचंद, रजनी, वागले की दुनिया, नुक्कड अशा अनेक मालिकांना त्यावेळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. अशाच मालिकांमध्ये 'मुंगेरीलाल के हसीन सपने' ही मालिका होती. त्यात शेखचिल्लीसारखी सतत स्वप्ने पाहणार्‍या मुंगेरीलालची भूमिका रघुवरी यादवने केली होती. आता ही स्वप्ने मोठ्या पडद्यावर अवतरणार असून, त्यामध्ये मुंगेरीलालची भूमिका रणबीर कपूर करणार आहे. रणबीरने आपल्या आतापर्यंतच्या छोट्याशा कारकिर्दीतही अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहते. त्याचा 'रॉकेटसिंग' असो किंवा 'बर्फी' सर्व भूमिका त्याने चांगल्या वठवल्या होत्या. आता तो किशोरकुमार यांची भूमिकाही साकारणार आहे. त्याच्या या वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये आता या मुंगेरीलालचीही भर पडली आहे. 1989-90 मधील या मालिकेचे रूपांतर आता प्रकाश झा यांच्याकडून चित्रपटात होणार आहे. तेवीस वर्षांपूर्वी विनोदाच्य माध्यमातून समाजातील वैगुण्यावर टीका करण्याचा प्रयत्न या मालिकेतून यशस्वी झाला होता. तो आता या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून होतो का, हे पाहायचे!



एशला लठ्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सर्वाधिक लठ्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या स्पर्धेत ऐश्वर्याने सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, जरीन खान या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. या श्रेणीत झालेल्या मतदानात ऐश्वर्याला सर्वाधिक मते 30 टक्के मिळाली. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाला 24, जरीन खानला 21, तर विद्या बालनला 19 टक्के मते मिळाली. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे वजन खूप वाढले होते. त्यासाठी ऐश्वर्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर ऐश्वर्याने प्रयत्नपूर्वक वजन कमी केले. तरीही तिला लठ्ठ ‍अभिनेत्रीचा किताब जाहीर झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर