2 दशकांनंतर रोहिणी हट्टंगडी मराठी सिनेमात

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर चार दशके अनेकविध भूमिका साकारणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता तब्बल दोन दशकांनंतर मराठी सिनेमात भूमिका रंगविणार आहेत. पुढील महिन्यात पडद्यावर झळकणार्‍या 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटाच्या निमित्ताने सिनेरसिकांना मराठी चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांचे दर्शन होणार आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत मुक्त संचार करणारी ही ज्येष्ठ अभिनेत्री पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडदा गाजविण्यासाठी सिद्ध होत आहे. 'प्रेमाची गोष्ट' हा सिनेमा लग्नसंस्था आणि प्रेमकथेवर आधारित असून, यात रोहिणी हट्टंगडी 'आई' ही भूमिका साकारत आहेत. लग्नसंस्था या सिनेमाच्या विषयाला धरून त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्या याबाबत म्हणतात की, सहवासानंतर प्रेम आणि प्रेमानंतर सहवास हे दोन्ही प्रकार वेगळे असले तरी प्रेम व लग्न या गोष्टी वेगवेगळ्या असू शकत नाहीत. लग्न हे महत्त्वाचे बंधन असते. दोन व्यक्तींच्या परस्परपूरक सामंजस्याला लग्नसंस्थेत महत्त्व आहे. पूर्वी घटस्फोट हा शब्दही जपून वापरला जायचा, परंतु आता स्थिती बदलली आहे. आजकाल बांधिलकीची भावना कमी पडतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रेमाची गोष्ट हा सिनेमाही या शोधाचा एक भाग आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर